Kapil Dev | दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Kapil Dev | दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली : भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. (Cricketer Kapil Dev Hospitalized After Suffering Heart Attack)

कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता.

कपिल देव यांची कारकीर्द

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

संबंधित बातम्या :

‘83’मधून कपिल देव यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

रणवीर आणि कपिल देव यांचा निळ्या जर्सीतला फोटो बघितलात का? 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI