AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर 19 संघात महिला क्रिकेटपटूचा नवा विक्रम, एकटीनेच अख्ख्या संघाला तंबूत पाठवले

अंडर-19 क्रिेकट सामन्यांमध्ये चंदीगड संघाची कर्णधार काशवी गौतमने एक नवा इतिहास रचला (New record in women cricket team) आहे.

अंडर 19 संघात महिला क्रिकेटपटूचा नवा विक्रम, एकटीनेच अख्ख्या संघाला तंबूत पाठवले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 26, 2020 | 1:19 PM
Share

चंदीगड : अंडर-19 क्रिेकट सामन्यांमध्ये चंदीगड संघाची कर्णधार काशवी गौतमने एक नवा इतिहास रचला (New record in women cricket team) आहे. अरुणाचल प्रदेशच्या विरोधात एकदिवसीय सामन्यात काशवीने एकटीनेच सर्व दहा विकेट घेतले आहेत. असा विक्रम करणारी काशवी भारतातील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. या रेकॉर्डमध्ये एका हॅट्रिकचाही (New record in women cricket team) समावेश आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने काशवीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने एकूण 4.5 षटक टाकले. ज्यामध्ये 12 धावा देत तिने 10 विकेट्स घेतल्या आहेत. तिने तिच्या दुसऱ्या षटकात तिने हॅट्रिकही घेतली.

काशवीने फंलदाजीमध्येही आपली कमाल दाखवली आहे. तिने 68 चेंडूत 49 धाव केल्या आहेत. त्यामुळे चंदीगड संघाने 50 षटकात 4 विकेट देत 186 धावा केल्या. एवढ्या कमी धावा असल्यामुळे काशवीने आपल्या गोलंदाजीतून प्रितस्पर्धी संघाचा पराभव केला.

पहिल्या षटकात काशवीने दोन विकेट घेतले. दोन्ही फलंदाज एकही धावा न करता मैदानाबाहेर पडले. दुसऱ्या षटकात तिने सलग तीन विकेट घेतले. तिसऱ्या षटकात तिने दोन विकेट घेतल्या. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या धावा दहाच्या पुढेही नव्हत्या. त्यासोबत 7 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा काशवीने नवव्या षटकात काशवीने तीन विकेट घेत सामना संपवला.

अरुणाचल प्रदेशचा संघ फक्त 25 धावा करु शकला. 161 धावांनी त्यांचा पराभव झाला. आठ फलंदाज एकही धावा करु शकले नाही. विशेष म्हणजे कोणत्याही विकेटमध्ये इतर खेळाडूंचे योगदान राहिले नाही. प्रत्येक विकेट काशमीने आपल्या गोलंदाजीवर घेतले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ दोन खेळाडूंनी असा विक्रम केला आहे. भारताचे स्पिनर अनिल कुंबले यांनी 1999 मध्ये पाकिस्तान विरोधात सर्व 10 विकेट घेतेल होते. तर यापूर्वीही 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात इंग्लंडचा ऑफ-स्पिनर जिमने हा कारनामा केला होता.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?