UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

यूरो कप 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेतील Denmark vs Finland सामनादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिश्चन एरिक्सन (Christian Eriksen) अचानक मैदानावर बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे.

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित
Christian Eriksen collapsed
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:49 PM

कोपनहेगन : यूरो कप 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेतील Denmark vs Finland सामनादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिश्चन एरिक्सन (Christian Eriksen) अचानक मैदानावर बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला. या घटनेमुळे फुटबॉल जगताला मोठा धक्का बसला आहे. कोपनहेगनच्या पार्कन स्टेडिअमवर (Copenhagen Parken Stadium) फिनलँड आणि डेन्मार्क यांच्यात शनिवारी हा सामना खेळवला जात होता. या सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये एरिक्सन मैदानावर बेशुद्ध पडला. (Denmarks Christian Eriksen conscious in hospital after collapsing at Euro 2020)

एरिक्सन पडल्याचे पाहून दोन्ही संघातील खेळाडू आणि क्षेत्ररक्षकांनी तातडीने त्याच्या दिशेने धाव घेतली. तसेच हा सामना थांबवण्यात आला. यानंतर एरिकस्नवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर यूरो कप 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेतील फिनलँड आणि डेन्मार्क यांच्यातील सामना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे त्वरित स्थगित करण्यात आला. एरिक्सन मैदानात पडल्याचे पाहून सर्व प्रेक्षक स्तब्ध झाले. तसेच मैदानातही निरव शांतता पसरली होती. त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर डेन्मार्कमधील अनेक खेळाडूंना मैदानातच रडू कोसळले.

ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानतंर चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर प्रार्थना केली आहे. ट्विटरवर हॅशटॅगदेखील ट्रेंड होऊ लागला आहे.

प्रकृती स्थिर

दरम्यान, एरिक्सनच्या प्रकृतीसंदर्भात UEFA ने दिलेल्या अधिकृत निवेदनात असे सांगण्यात आले की, त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला रुग्णालयातच ठेवलं जाणार आहे.

हे ही वाचा

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(Denmarks Christian Eriksen conscious in hospital after collapsing at Euro 2020)

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.