धोनीचे 6 भाषांमध्ये प्रश्न, मुलीकडून 6 भाषांमध्ये उत्तर

नवी दिल्ली : क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा या दोघांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या मुलीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये धोनीची मुलगी जीवा हिने तब्बल सहा भाषांमध्ये वडिलांना उत्तर दिली आहेत. जीवाचा अनोखा अंदाज पाहून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर …

धोनीचे 6 भाषांमध्ये प्रश्न, मुलीकडून 6 भाषांमध्ये उत्तर

नवी दिल्ली : क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा या दोघांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या मुलीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये धोनीची मुलगी जीवा हिने तब्बल सहा भाषांमध्ये वडिलांना उत्तर दिली आहेत. जीवाचा अनोखा अंदाज पाहून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीने शेअर केलल्या व्हिडीओमध्ये धोनी आणि जीवा दिसत आहे. यावेळी धोनीने तब्बल सहा वेगवेगळ्या भाषामधून जीवाला आपली तब्येत कशी आहे याबाबत विचारणा केली. या प्रश्नांना जीवानेही वडिलांनी विचारलेल्या भाषांमधून तिने उत्तर दिली आहेत. यामध्ये तामिळ, गुजराती, बंगाली, उर्दू, भोजपुरी आणि पंजाबी या सहा भाषमधून धोनीने जीवाला प्रश्न विचारली आहेत.

याआधीही धोनीने आपल्या मुलीसोबतचे  अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र आताच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत सर्वात गोड अंदाजात जीवाने भोजपुरी भाषेतून दिलेलं उत्तर चाहत्यांना आकर्षित करत आहे. आतापर्यंत तब्बल 36 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. धोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *