5 वर्ष सिक्रेट डेटिंग, भर मैदानात प्रपोज….स्मृती मानधना अन् पलाशची लव्हस्टोरी लग्नापर्यंत कशी पोहोचली माहितीये?
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार आहे.त्याची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान त्यांच्या विविहाची घोषणा तर सर्वांनाच माहित आहे. पण त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे माहितीये का? चला जाणून घेऊयात.

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आणि संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिनेही भारताला विश्वविजेते बनवण्यात मोठी भूमिका बजावली. या विश्वचषकात स्मृती मानधना हिने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि तिची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. भारताच्या विजयानंतर स्मृती मानधना हिचा प्रियकर पलाश मुच्छल देखील मैदानावर दिसला आणि दोघांनीही एकत्र विजय साजरा केला.
23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा
दरम्यान ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार आहे. स्मृती मानधनाचा लग्न सोहळ्याची जय्यत तयारी देखील सुरु आहे. नवरदेव पलाशचे सांगलीत दणक्यात स्वागत करण्यात आले होते. 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडणार आहे. सध्या सर्वांची लाडकी असणाऱ्या या जोडीची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली माहितीये का? चला जाणून घेऊयात.
अशी सुरु झाली स्मृती आणि पलाशची प्रेमकहाणी
भारताच्या विजयानंतर, स्मृती मानधना तिचा प्रियकर पलाशसोबत विश्वचषक हातात धरतानाचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांचे नाते किती घट्ट आहे हे दिसून आलं. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी, स्मृती मानधना आणि पलाश लग्न करू शकतात असे अनेक वृत्त समोर आले होते. दरम्यान स्मृती मानधनाने 2024 मध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या नात्याची घोषणा केली. हे दोघे 2019 पासून डेटिंग करत आहेत. त्या वर्षी त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. म्हणजे त्यांच्या नात्याला तब्बल 5 वर्ष झाली आहेत.
View this post on Instagram
दरम्यान पलाशने त्याची बहीण पलक जे की एक प्रसिद्ध गायिका आहे हिच्यासमोर गाणे गाऊन स्मृतीला प्रपोज केले होते. स्मृतीचे पलाशची बहीण पलक मुच्छल हिच्याशी देखील एक खास बॉंड आहे. त्या एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
स्मृती आणि पलाश यांच्या वयात किती वर्षांचा फरक?
स्मृती आणि पलाश यांच्या वयात फक्त एक वर्षाचे अंतर आहे. स्मृती मानधना यांचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला होता, तर पलाशचा जन्म 22 मे 1995 रोजी झाला होता. स्मृती सध्या 29 वर्षांची आहे, तर पलाश 30 वर्षांचा आहे, त्यांच्यात फक्त एक वर्षाचे अंतर आहे. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकत आहे.
