AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy उपांत्य फेरीतील पहिल्या डावात ईस्ट आणि सेंट्रल झोन 266 धावांवरच बाद, सामना ड्रॉ झाला तर निकाल काय? जाणून घ्या

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन आमनेसामने आहेत. या सामन्यात दोन्ही संघ पहिल्या डावात 266 धावा करू शकले. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला तर निकाल कसा लागणार? हा प्रश्न आहे. यासाठी नियम असून निकालासाठी या दोन गोष्टी तपासल्या जातील.

Duleep Trophy उपांत्य फेरीतील पहिल्या डावात ईस्ट आणि सेंट्रल झोन 266 धावांवरच बाद, सामना ड्रॉ झाला तर निकाल काय? जाणून घ्या
Duleep Trophy उपांत्य फेरीतील पहिल्या डावात ईस्ट आणि सेंट्रल झोन 266 धावांवरच बाद, सामना ड्रॉ झाला तर निकाल काय? जाणून घ्याImage Credit source: BCCI Video Grab
| Updated on: Aug 31, 2026 | 5:15 PM
Share

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात सारख्याच 266 धावा केल्या. सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ईस्ट झोन संघही 266 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला तर निकाल कसा दिला जाईल? कारण पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या संघाला विजयी घोषित केलं जातं. पण या सामन्यात स्थिती काही वेगळी आहे. कारण दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल कोणत्या आधारावर दिला जाईल. तसेच अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल हा प्रश्न आहे. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील, तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

… तर असा विजेता ठरवला जाईल

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या नियमानुसार, हा सामना ड्रॉ झाला तर दुसऱ्या डावातील कामगिरीच्या आधारे विजेता घोषित केला जाईल. पहिल्या डावात दोन्ही संघांनी 266 धावा केल्या आहे. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीचा नियम येथे लागू होणार नाही. सामना ड्रॉ झाल्यास दुसऱ्या डावात ज्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत . त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. तसेच त्याला पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल.

दुसऱ्या डावात सेंट्रल झोन फलंदाजी करत आहे. जर उर्वरित सर्व दिवस सेंट्रल झोनने फलंदाजी केली आणि ईस्ट झोनला बॅटिंग दिलीच नाही तर सेंट्रल झोन विजयी घोषित केला जाईल. या सामन्यात ईस्ट झोनपेक्षा एक धाव जरी जास्त तर सेंट्रल झोनला विजयी घोषित केलं जाईल. कारण सामना ड्रॉ झाला तरी सेंट्रल झोनकडे आघाडी असेल. त्यामुळे ईस्ट झोनला दुसऱ्या डावात फलंदाजी मिळेपर्यंत हा सामना पूर्णपणे सेंट्रल झोनच्या पारड्यात झुकलेला असेल.

समजा, दुसऱ्या डावात पावसामुळे व्यत्यय आला असता आणि एकही चेंडू टाकला नसता, तर विजयी कोण? हा प्रश्नही अनेकांना पडला होता. जर अशी स्थिती ओढावली असती तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं असतं. पण या सामन्यात तशी काही स्थिती नाही. कारण सेंट्रल झोनने 3 गडी गमवून 38 धावा केल्या आहेत.

Follow Us
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल