AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा पुन्हा तीच चूक! तसंच केलं आणि नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला, किती वेळा असं झालं?

Vaibhav Sooryavanshi in Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. पण पुन्हा एकदा शतक ठोकण्यापासून वंचित राहिला. एक चूक त्याला पुन्हा महागात पडली. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात...

वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा पुन्हा तीच चूक! तसंच केलं आणि नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला, किती वेळा असं झालं?
वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा पुन्हा तीच चूक! तसंच केलं आणि नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला, किती वेळा असं झालं? Image Credit source: BCCI Video Grab
| Updated on: Aug 31, 2026 | 2:24 PM
Share

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेंट्रल झोन आणि ईस्ट झोन आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ईस्ट झोनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 266 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ईस्ट झोनकडून अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने अक्षरश: कहर केला आणि सेंट्रल झोन संघावर तुटून पडले. अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशीने पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली. यात वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 81 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकार मारत 92 धावांची खेळी केली. पण यावेळीही कमनशिबी निघाला. कारण त्याचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं.

वैभव सूर्यवंशी नर्व्हस नाइंटीजवर बाद होण्याची ही काय पहिली वेळ नाही. मागच्या दोन वर्षात 90 ते 99 दरम्यान बाद होण्याची त्याला सवयच लागली आहे. खरं तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला शतक ठोकण्याची संधी होती. पण ही त्याच्याकडून हुकली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीने 90 धावांचा पल्ला पार केला की बाद होण्याची शक्यता अधिक असते का? खरं तर शतकाच्या बाबतीत जास्त विचार केला की असं होतं, असं मानलं जातं. पण वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत असं नाही. कारण वैभवचा खेळ आक्रमक आहे आणि त्याला शतकाची पर्वा नाही. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत असंच घडलं आणि शतक हुकलं.

वैभव सूर्यवंशी नर्व्हस 90 वर किती वेळा बाद झाला?

  • वैभव सूर्यवंशी मागच्या दोन वर्षात सात वेळा नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला आहे. त्याने शतकाच्या सात संधी गमावल्या आहेत.
  • 4 नोव्हेंबर 2025 या दिवशी बिहारसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना मेघालयविरुद्ध 93 धावांवर बाद झाला होता. या सामन्यातून त्याने पहिल्यांदा फर्स्ट क्लास अर्धशतक ठोकलं होतं. पण शतक 7 धावांनी हुकलं.
  • 10 जानेवारी 2026 रोजी अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या वॉर्म अप सामन्यात स्कॉटलँडविरुद्ध 96 धावांवर बाद झाला होता.
  • 19 मे 2026 रोजी आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना शतकापासून वंचित राहिला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 93 धावा केल्या होत्या. पण त्याचं शतक हुकलं.
  • 27 मे 2026 रोजी आयपीएल 2026 रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 97 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं.
  • 29 मे 2026 आयपीएल 2026 क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्स विरुद्ध त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. पण येथेही त्याचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. आयपीएल 2026 स्पर्धेत तीन शतकं हुकली.
  • 21 जून 2026 रोजी इंडिया ए कडून खेळताना श्रीलंका ए विरुद्ध ट्राय सीरिज अंतिम फेरीत 94 धावांवर बाद झाला. यावेळी त्याने फक्त 29 चेंडूत ही कामगिरी केली होती.
  • 31 ऑगस्ट 2026 रोजी दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत ईस्ट झोनकडून खेळताना 92 धावांवर बाद झाला.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट