Gautam Gambhir : टीम इंडियासाठी आज मोठा दिवस, त्याआधी गौतम गंभीरची ड्रेसिंग रुममधली नको ती कृती होतेय व्हायरल Video
Gautam Gambhir : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेला तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. आज शुबमन गिलच्या युवा टीम इंडियाकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पण त्याआधी टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांची एक कृती वादात सापडली आहे. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रुममधला त्यांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.

एजबेस्टन नंतर लॉर्ड्स टेस्टमध्ये सुद्धा टीम इंडिया इतिहास रचण्याच्या जवळ आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आणखी एक यशस्वी स्क्रिप्ट लिहिण्याची संधी आहे. गिल अँड कंपनीने लॉर्ड्सवर तिरंगा झळकवला तर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या कोचिंग करिअरच्या दृष्टीने ही एक मोठी गोष्ट असेल. पण त्याआधीच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लॉर्ड्सच्या गॅलरीत बसून गौतम गंभीर एक शिवी घालताना दिसतोय. आता प्रश्न हा आहे की, लाइव्ह मॅचमध्ये गौतम गंभीर ही शिवी कोणाला आणि का देतोय?.
गौतम गंभीरचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाचा असल्याची माहिती आहे. म्हणजे इंग्लंडच्या टीमची दुसरी इनिंग सुरु होती. टीम इंडिया फिल्डिंग करत होती. व्हिडिओमध्ये फेस एक्सप्रेशन पाहून गौतम गंभीर काय बोलत असेल, याचा अंदाज लावता येतो. असं वाटतं, त्याने लाइव्ह मॅचमध्ये अपशब्द वापरले. म्हणजे शिवी घातली.
ते कुठल्या गोष्टीवर इतके नाराज आहेत?
आता प्रश्न हा आहे, व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे हेड कोच कोणाला शिवी घालतायत?. ते कुठल्या गोष्टीवर इतके नाराज आहेत?. या प्रश्नांवर काही ठोस उत्तर नाहीय. पण फुटेजपाहून असं दिसतं की, गंभीर आपल्याच खेळाडूंवर भडकले असावेत. कदाचित ते आपल्या टीमच्या फिल्ड प्लेसमेंटवर समाधानी नसतील.
टीम इंडियाकडे मोठी संधी
लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 193 धावांच लक्ष्य ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने 4 विकेट गमावून 58 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 135 धावांची गरज आहे. 6 विकेट बाकी आहेत. भारताने हा कसोटी सामना जिंकला, तर लॉर्ड्समध्ये टीम इंडियाचा हा चौथा विजय असेल. शुबमन गिल अशी कमाल करणारा चौथा भारतीय कर्णधार असेल.
Finally Got that Clip😭🔥pic.twitter.com/4LztNZro44
— 𝗣𝗦𝗬𝗖𝗛𝗢²³🇮🇳 (@GoatGambhir97) July 13, 2025
39 वर्ष जुना इतिहास बदलण्याची संधी
लॉर्ड्सच्या मैदानावर भारताकडे सलग दुसरा कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे. पण या मैदानावर टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाच प्रदर्शन काही खास नाहीय. टीम इंडियाला 39 वर्ष जुना इतिहास बदलावा लागेल. टीम इंडियाने आतापर्यंत सातवेळा लॉर्ड्सच्या मैदानावर धावांचा पाठलाग केलाय. पण या सात प्रसंगात टीम इंडियाला फक्त एकदाच विजयाची चव चाखता आली आहे. टीम इंडियाच्या उर्वरित सहा फलंदाजांकडे आज हा इतिहास बदलण्याची मोठी संधी आहे.
