Moeen Ali | इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 04, 2021 | 7:38 PM

इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोनाची लागण झाली आहे.

Moeen Ali | इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग
क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोनाची लागण

Follow us on

कोलंबो : इंग्लंड क्रिकेट टीमचा (England Cricket Team) अष्टपैलू खेळाडू  मोईन अली याला कोरोनाचा लागण (Moeen Ali Corona) झाली आहे. मोईन अलीला श्रीलंकेत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. श्रीलंकेत पोहचल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली. या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडचा संघ काल 3 जानेवारीला श्रीलंकेत पोहचला होता. यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली. यामध्ये मोईन अली पॉझिटिव्ह सापडला. मोईल पॉझिटिव्ह असल्याने त्याला 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.  (England Cricketer Moeen ali tetsted corona positive)

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.  इंग्लंड या दौऱ्यावर श्रीलंकेविरोधात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 2 कसोटी सामने  खेळण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका मार्च 2020 मध्ये खेळण्यात येणार होती. मात्र तेव्हा कोरोनाचा प्रसार वाढत होता. त्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला. दरम्यान आता कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता ही कसोटी मालिका खेळली जाणार आहे.  14-18 जानेवारीला पहिला तर 26-30 जानेवारीला दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

ख्रिस वोक्सही आयसोलेट

“इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सलाही आयसोलेट करण्यात आलं आहे. वोक्स मोईन अलीच्या संपर्कात आला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वोक्सला आयसोलेट केलं गेलं आहे. वोक्सवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. तसेच लवकरच त्याचीही कोरोना चाचणी केली जाईल”, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.

PHOTO | कोरोनामुळे स्थगित झालेली कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत दाखल

(England Cricketer Moeen ali tetsted corona positive)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI