AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England Tour India : कोणत्याही सामन्यांचं यजमानपद न मिळाल्याने ‘या’ क्रिकेट बोर्डांमध्ये नाराजी

इंग्लंड या दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

England Tour India : कोणत्याही सामन्यांचं यजमानपद न मिळाल्याने 'या' क्रिकेट बोर्डांमध्ये नाराजी
| Updated on: Dec 13, 2020 | 11:23 AM
Share

बंगाल : इंग्लंडचा संघ 2021 मध्ये भारत दौऱ्यावर (India vs England 2021) येणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या भारत दौऱ्याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं. या दौऱ्यातील सामने फक्त 3 ठिकाणी अर्थात 3 स्टेडियममध्येच खेळण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे इतर राज्यातील संघांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजत आहे. इतकच काय तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) पश्चिचम बंगाल संघानेही सामन्याच्या यजमानाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. England Tour India 2021  Mumbai and Bengal cricket boards angry over not hosting any matches

बीसीसीआयने शुक्रवारी 11 डिसेंबरला इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका, 5 मॅचची टी 20 मालिका आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहेत. या अशा एकूण 12 सामन्यांचे आयोजन केवळ अहमदाबाद येथील मोटेरा, पुणे आणि चेन्नईत करण्यात आले आहे. बीसीसीआयने या निर्णयामुळे इतर राज्यातील संघांना नाराज केलं आहे.

गुजरातमधील सर्वाधिक सामन्यांवरुन आक्षेप

या एकूण दौऱ्यात 12 सामने खेळले जाणार आहेत. या 12 पैकी 7 सामन्यांच्या यजमानपदाची संधी गुजरात क्रिकेट संघाला मिळाली आहे. गुजरातमधील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या मोठ्या स्टेडियममध्ये 2 कसोटी आणि 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. 7 सामन्यांचं आयोजनाचा मान गुजरातला मिळाल्याने इतर राज्यातील क्रिकेट संघांनी आक्षेप घेतला आहे. तसेच 24 डिसेंबरला बीसीसीआयच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे सर्वाधिक सामन्याच्या आयोजनपदाचा मान गुजरातला मिळाला असल्याची चर्चाही सुरु आहे.

अभिषेक दालमियाने उपस्थित केले प्रश्न

आएएनएसच्या वृत्तानुसार बंगाल क्रिकेट संघ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला 12 पैकी एकही सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला नाही. त्यामुळे या दोन्ही क्रिकेट मंडळांनी आक्षेप घेतला आहे. एमसीएला गेल्या 4 वर्षात एकाही कसोटी सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला नाही. या सर्व प्रकरणी अभिषेक दालमिया यांनी बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितले आहे. गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष असताना दालमिया हे सचिव होते. दालमिया हे गांगुलीच्या मर्जीतले आहेत.

याबाबत एमसीएकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. एमसीएचे कार्यकारी समितिचे सदस्य नदीम मेनन यांनी सर्व सदस्यांच्यावतीने प्रश्न उपस्थित केला. गेल्या 4 वर्षात एमसीएला एकाही कसोटी सामन्याच्या आयोजनाचा मान का मिळाला नाही, असा प्रश्न मेनन यांनी एमसीए अध्यक्ष विजय पाटील यांना प्रश्न केला.

गांगुलीकडून आयोजनाबाबत आश्वासन

मुंबई आणि बंगाल या दोन्ही क्रिकेट बोर्डांना इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील काही सामन्यांच्या आयोजनाचा मान मिळेल, असा शब्द सौरव गांगुलीने सप्टेंबर महिन्यात दिला होता. मात्र तसं न झाल्याने या दोन्ही क्रिकेट बोर्डात नाराजीचं वातावरण आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिले 2 सामने हे चेन्नई तर उर्वरित 2 सामने अहमदाबादमध्ये खेळण्यात येणार आहेत. यानंतर 5 सामन्यांची टी 20 मालिका अहमदाबादमध्ये तर एकदिवसीय मालिका पुण्यात खेळण्यात येणार आहे.

आर्थिक कोंडी होण्याची भिती

या दोन्ही क्रिकेट मंडळाना आर्थिक कोंडी होण्याची भिती सतावतेय. दीर्घ काळ जर कोणत्याही सामन्याचं आयोजनाचं मान मिळाला नाही, तर आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. आधीच कोरोनामुळे अनेक स्पर्धा या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे ही चिंता या क्रिकेट मंडळांना सतावतेय.

बीसीसीआय प्रत्येक सामन्यासाठी किती पैसे देते?

बीसीसीआय प्रत्येक क्रिकेट मंडळाला सामन्याच्या प्रकारानुसार आयोजनासाठी एक ठराविक रक्कम देते. एका कसोटी सामन्यासाठी 2 कोटी 50 लाख देण्यात येतात. तसेच एकदिवसीय आणि टी 20 सामन्यासाठी 1 कोटी 50 लाख देण्यात येतात.

संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

England Tour India 2021  Mumbai and Bengal cricket boards angry over not hosting any matches

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.