Virat kohli : विराटच्या अंड्यावरुन ट्विटरवर घमासान, शेवटी चाहते म्हणाले, ‘तू काय पण खा पण RCB ला कप जिंकवून दे!’

Virat kohli : विराटच्या अंड्यावरुन ट्विटरवर घमासान, शेवटी चाहते म्हणाले, 'तू काय पण खा पण RCB ला कप जिंकवून दे!'
विराट कोहली

विराटच्या ट्विटनंतर काही हुशार फॅन्सनी त्याच्या शाळा घेतली आहे. काही फॅन्सने त्याला सांगितलं की, 'विराट सर तुम्ही डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप मिळवून द्या...' (Fans reaction On Virat kohli Egg Diet)

Akshay Adhav

|

Jun 02, 2021 | 8:12 AM

मुंबई :  भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) डाएट प्लॅनवरुन गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर घमासान सुरु आहे (Virat kohli Diet). चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामच्या एका लाईव्ह सेशनदरम्यान कोहलीने आपण डाएटमध्ये अंड खात असल्याचं जाहीर केलं. कोहलीच्या या गौप्यस्फोटानंतर चतुर नेटकऱ्यांनी त्याला त्याच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत त्याला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. मग विराटने एक ट्विट करत ‘मी तसा दावाच केला नव्हता’, असं म्हणत पुन्हा चाहत्यांच्या कोर्टात बॉल ढकलला. अखेर चाहत्यांनीच एक पाऊल मागे घेत शेवटी विराटला शहाणपणाचा सल्ला देत, ‘बाबा तू डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप जिंकवून दे’ असं म्हटलं. क्रिकेट फॅन्स आणि विराटच्या या टिट-टिवच्या खेळात नेटकऱ्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन होतंय. (Fans reaction On Virat kohli Egg Diet)

सोशल मीडियावरचा वाद काय, विराटचं ट्विट काय?

आपल्या फॅन्ससोबतच्या संभाषणात विराट कोहलीने आपल्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश असल्याचं सांगितलं. विराटने डाएट प्लॅन सांगितल्याबरोबर चाहत्यांना त्याच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण झाली. विराटने त्याच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये व्हीगन असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच जे लोक आहारात मास आणि डेअरी पदार्थांचं सेवन करत नाहीत, असा उल्लेख केला होता.

सोशल मीडियावर सुरु झालेल्या वादानंतर विराटने नवीन ट्विट केलंय. मी कधीच व्हीगन असल्याचा दावा केला नाही. मी शाहाकारी आहे, मी पहिल्यापासून सांगत आलोय. दिर्घ श्वास घ्या आणि शाहाकार घ्या (जर तुमची इच्छा असेल तर…), असं तो ट्विटमध्ये म्हणाला आहे.

फॅन्सने भरवली शाळा!

विराटच्या ट्विटनंतर काही हुशार फॅन्सनी त्याच्या शाळा घेतली आहे. काही फॅन्सने त्याला सांगितलं की, ‘विराट सर तुम्ही डाएटमध्ये काहीही खा पण आरसीबीला कप मिळवून द्या…’ तर दुसऱ्या एका फॅन्सने म्हटलं, ‘तुम्ही डाएटमध्ये वाटेल ते खा पण एक शतक ठोका, कारण शेवटचं शतक ठोकून खूप दिवस झालेत आता….’

(Fans reaction On Virat kohli Egg Diet)

हे ही वाचा :

WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें