अतितटीच्या सामन्यात मुंबईची नाशिकवर सरशी, शेवटच्या काही क्षणात बाजी पालटत उपांत्य फेरीत धडक

एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूलने (नवी मुंबई) उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज 3-2 ने पराभव करत पुढच्या फेरीत स्थान मिळवलं आहे.

अतितटीच्या सामन्यात मुंबईची नाशिकवर सरशी, शेवटच्या काही क्षणात बाजी पालटत उपांत्य फेरीत धडक
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 6:02 PM

पुणे : महाराष्ट्र सरकार आणि एफसी बायर्न क्लब जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने पुण्यातील बालेवाडीत पार पडलं. उपांत्यपूर्व फेरीत नाशिक विरुद्ध मुंबई हा सामना अतितटीचा ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या डावात मुंबईची सरसी होती. पण दुसऱ्या डावात नाशिकनं पुनरागमन करत एकामागोमाग दोन गोल करत बरोबरी. पण शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईनं गोल मारला आणि 3-2 अशी आघाडी घेत विजय मिळवला.

मुंबईकडून नेथान वाझनं तीन गोल झळकावले. तर नाशिककडून युवराज कदम आणि निबाश सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. नेथान सिंहनं 69 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. या गोलमुळे नाशिकच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. आता उपांत्य फेरीत मुंबईचा सामना पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलसोबत असणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करणार आहे.

उपांत्य फेरी (2 मार्च 2023)

  • नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल (पुणे) विरुद्ध फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल (नवी मुंबई)
  • क्रीडा प्रबोधिनी (पुणे) विरुद्ध महाराष्ट्र हायस्कूल (कोल्हापूर)

दोन्ही संघाचे खेळाडू

फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल, नवी मुंबई – अर्सालान शेख, कविश साली, तनिष्क सिंग, विहान शर्मा, नेथान वाझ, रायन परेरा, संगमेश चारे, पृथ्वीराज राणावत, मोहम्मद झियान शेख, रुद्रा दावखार, झैन मोडक, कार्तिक मंधारे, सर्वेश यादव, लक्ष मालकर, आरुष राव, अधवेत सांळुखे, रियो पेन, अनवी काळे, आदित्य गुप्ता, आर्यन पिंगळे

बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक –आरव तांडले, जोनाथन मेंडेझ, ब्रायन कॉक्स, शादाब सय्यद, केल्विन पायपर, आदित्य शहा, रॉयस सिंह, गोवन सिंह, रुद्र पटेल, रायन धवरे, निबाश सिंह, कृष्ण सिंह, गंधार मयेकर, हृदय शहा, आदित्य सिंह, आदित महाडिक, हनीश सिंग, रणवीर कुमार, युवराज कदम.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.