Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या उपस्थित अल नस्रचा पहिला पराभव, कर्णधाराने असा काढला राग

फीफा फुटबॉलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोनाल्डो रडताना दिसला होता. आता एका पराभवामुळे पुरता हतबल झाल्याचं दिसून आला. तसेच प्रेक्षकांनीही डिवचल्याने राग अनावर झाला.

Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या उपस्थित अल नस्रचा पहिला पराभव, कर्णधाराने असा काढला राग
अरे रे..! फ्री किक गमावली आणि शेवटी रोनाल्डोनं केलं असं की प्रेक्षकांनीही डिवचलं Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:18 PM

मुंबई : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या अल नस्र क्लबसाठी खेळत आहे. पण सौदी प्रो लीगच्या एका सामनम्यात अल इत्तेहानं रोनाल्डोच्या अल नस्रला पराभवाचं पाणी पाजलं. 38 वर्षीय रोनाल्डो क्लबसोबत खेळताना हा पहिलाच पराभव आहे. पराभवानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थानही गमावलं आहे. रोनाल्डो अल इत्तेहाद विरुद्ध संपूर्ण सामना खेळला पण एकही गोल करू शकला नाही. संघाला 1-0 ने हार पत्कारावी लागली. रोनाल्डोजवळ दुसऱ्या सत्रात गोल करण्याची नामी संधी होती. फ्री किकला गोलमध्ये परावर्तित करण्यात रोनाल्डोला अपयश आलं.

पराभवानंतर रोनाल्डो चांगलाच वैतागलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगत होते. ड्रेसिंग रुममध्ये जात असताना त्याने अखेर आपला राग एका बॉटलवर काढला. बॉटलवर जोरदार लाथ मारत आपला राग व्यक्त केला. यावेळी इत्तेहादचे चाहते त्याला मेस्सी-मेस्सी करत चिडवत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पराभवानंतर रोनाल्डोने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “निकालामुळे मी पुरता निराश आहे. पण सीझनमधील पुढच्या सामन्यात पुनरागमन करू आणि आपल्या संघाला सपोर्ट केल्याबद्दल चाहत्यांचे आभार.”

पहिल्या सत्रात रोनाल्डोच्या अल नस्र संघाला गोल करण्याचे काही संधी मिळाल्या. रोनाल्डोने गोल पोस्टकडे जोरदार किक मारली खरी पण अल इत्तेहादच्या गोलकिपर मार्सेलो ग्रोहने बॉल पकडला. दुसऱ्या हाफमध्ये इत्तेहाद संग गोल करण्यात यशस्वी ठरला.

सामन्याच्या 80 व्या मिनिटाता ब्राझीलच्या रोमारिंहो गोल करत अल इत्तेहादला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर गोलची बरोबरी करताना रोनाल्डोच्या संघाची चांगलीच दमछाक झाली.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.