पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, आता राजकारणातही दमदार कामगिरी, बंगालमध्ये जिंकलेला मनोज तिवारी कोण?

माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा (Manoj Tiwari) बंगाल विधानसभेत (Bengal Asembly Election) विजय झाला आहे. त्याने भाजप उमेदवाराविरोधात ही मॅच जिंकली. (Manoj Tiwari Won Bengal Assembly Election)

पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, आता राजकारणातही दमदार कामगिरी, बंगालमध्ये जिंकलेला मनोज तिवारी कोण?
माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा बंगाल विधानसभेत विजय झाला आहे.

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू ज्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास छोटासा राहिला पण त्याने राजकारणाच्या पीचवर मात्र पहिल्याच प्रयत्नात दणदणीत यश मिळवलं. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा (Manoj Tiwari) बंगाल विधानसभेत (Bengal Asembly Election) विजय झाला आहे. त्याने भाजप उमेदवाराविरोधात ही मॅच जिंकली. नुकतीच बंगाल विधानसभेची निवडणूक पार पडली, रविवारी (3 मे) रोजी निकालही लागले. या निकालात तृणमूल काँग्रेसने शिवपूरच्या जागेवरुन क्रिकेटर मनोज तिवारीला उतरवलं होतं. भाजप उमेदवाराविरोधातली शिवपूरची मॅच मनोज तिवारीने दणदणीत जिंकली. (Former Cricketer Manoj Tiwari Won Bengal assembly Election TMC ticket Shibpur Vidhansabha)

मनोज तिवारीने प्रतिस्पर्धी उमेदवाराला क्लिन बोल्ड केलं!

कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानासुद्धा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडली. येथे एकूण 294 जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. मात्र, येथील 294 जागांपैकी शिवपूर (Shibpur Election) या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. येथे विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari ) यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत मनोज तिवारीने रथिन चक्रवर्तींचा 32 हजार मतांनी पराभव केला.

शिवपूरच्या पीचवर मनोज तिवारीने पाय रोवले!

निवडणूक जाहीर होताच शिवपूरच्या पीचवर मनोज तिवारीने घट्ट पाय रोवले होते. त्याने अगदी तळागाळात जाऊन प्रचार केला. लोकांषी संवाद साधला. त्यांना आपले मुद्दे पटवून दिले. भाजपच्या विरोधात देशभर कसं वातावरण आहे, हे सांगितलं. मतदारसंघात आपण पुझची पाच वर्ष काय काम करणार आहोत, हे उदाहरणांसहित पटवून दिलं. साहजिक शिवपूरच्या जनतेने पुढची पाच वर्ष जोरदार बॅटिंग करण्याची संधी मनोज तिवारीला दिली.

मनोज तिवारीची क्रिकेट कारकीर्द

मनोज तिवारीने भारतीय संघांसाठी 12 एकदिवसीय तर 3 टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांत त्याने 287 रन्स केले. त्यामध्येही त्याने एक शतक झळकावलं तर एक अर्धशतक ठोकलं. एकदिवसीय सामन्यात त्याचा 104 हा सर्वाधिक स्कोअर होता.

मनोज तिवाराची आयपीएलमधील कामगिरी

मनोज तिवारीने 98 आयपीएल मॅचेस खेळल्या ज्यामध्ये त्याने 28.72 च्या सरासरीने 1695 धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 75 इतका होता. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून मनोज तिवारी खेळला.

(Former Cricketer Manoj Tiwari Won Bengal assembly Election TMC ticket Shibpur Vidhansabha)

हे ही वाचा :

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज

Published On - 6:44 am, Mon, 3 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI