Shibpur Election Result 2021 LIVE : शिवपूरच्या पीचवर क्रिकेटपटू मनोज तिवारीला भक्कम लीड

Shibpur Assembly Election Result 2021 Live Update in Marathi : पश्चिम बंगालमधील 294 जागांपैकी शिवपूर या मतदारसंघाची विशेष चर्चा आहे.

Shibpur Election Result 2021 LIVE : शिवपूरच्या पीचवर क्रिकेटपटू मनोज तिवारीला भक्कम लीड
Shibpur Vidhansabha Seat
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 12:15 PM

कोलकाता : कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानासुद्धा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडली. येथे एकूण 294 जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली. मात्र, येथील 294 जागांपैकी शिवपूर (Shibpur Election) या मतदारसंघाची विशेष चर्चा आहे. येथे विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari ) यांना मैदानात उतरवलं आहे. तर भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती (Rathin Chakraborty) यांनी निवडणूक लढवलेली आहे. सुरुवातीच्या कलानुसार मनोज तिवारी यांनी आघाडी घेतली आहे. (Shibpur Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Shibpur Assembly MLA Seat Jatu Lahiri CLatest News in Marathi)

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्‍लॉकने (AIFB) पुन्हा एकदा जगन्नाथ भट्टाचार्य यांनाच संधी दिली आहे. शिवपूरला जिंकण्यासाठी येथे एकूण 10 उमेदवार उतरले आहेत. या सर्व उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले. येथ बहुमतासाठीचा जादूई आकडा 148 आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत काय झालं ?

पश्चिम बंगलाच्या हावडा जिल्ह्यात येणाऱ्या शिवपूर मतदारसंखाची नेहमीच विशेष चर्चा राहिलेली आहे. येथे मागील दोन निवडणुकींपासून सत्ताधारी टीएमसीचाच उमेदवारानेच बाजी मारलीये. 2016 साली येथून टीएमसीचे जुटू लाहड़ी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्‍लॉकचे (AIFB) जगन्नाथ भट्टाचार्य यांचा 27,014 मतांनी पराभव केला होता. जुटू लाहड़ी यांना येथे 88,076 मतं पडली होती. तर जगन्नाथ भट्टाचार्य यांना 61,062 जणांनी मत दिलं होतं.

एकूण मतदार किती ?

मिळालेल्या माहितीनुसार, मागील निवडणुकीत या मतदारसंघात भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. येथे भाजपला 13,363 मते मिळाली होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत येथे एकूण 2,16,988 मतदार होते. शिवपूर मतदासंघात एकूण 236 पोलिंग बुथवर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. येथे 2016 साली 78 टक्के मतदान झाले होते.

या मतदारसंघात 1967 साली पहिल्यांदा विधानसभेसाठी मतदान झाले. या पहिल्या निवडणुकीत येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यानंतर येथे पुढील निवडणुकींमध्ये फॉरवर्ड ब्लॉकचा दबदबा राहिला. या मतदारसंघातून आतापर्यंत 4 वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. शिवपूर मतदासंघात 2011 साली पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

मागील निवडणुकीतील आकडेवारी

सध्याचे आमदार : जुटू लाहड़ी

मिळालेली मतं : 88,076

एकूण मतदार : 2,16,988

प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी : 78.34 टक्के

एकूण उमेदवार -7

इतर बातम्या :

Kerala Exit Poll Result 2021 Elections : केरळवर पुन्हा एकदा डाव्यांचाच झेंडा, भाजपला किती जागा मिळणार ?

Exit Poll Results: पाच राज्यांमध्ये काय निकाल लागणार?, पाहा सर्व राज्यांचे एक्झिट पोल एका क्लिकवर

(Shibpur Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Shibpur Assembly MLA Seat Jatu Lahiri TMC Latest News in Marathi)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.