AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

French Open 2022: पुन्हा एकदा Rafael Nadal चं लाल मातीचा बादशाह, विक्रमी 22 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद

क्ले कोर्टवर आज झालेल्या सामन्यात राफेल नदालने कॅस्पर रुदवर असा 6-3 6-3 6-0 सरळ सेटमध्ये विजय मिळवला. राफेल नदालने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून विक्रमी 21 व्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच जेतेपद पटकावलं होतं. त्याची दुसऱ्या विजेतेपदावर नजर होती.

French Open 2022: पुन्हा एकदा Rafael Nadal चं लाल मातीचा बादशाह, विक्रमी 22 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद
राफेल नदालImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Jun 05, 2022 | 9:24 PM
Share

मुंबई : राफेल नदाल (Rafael Nadal) हा लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. आज त्याने तसाच खेळ दाखवला. स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदालने पुन्हा एकदा फ्रेंच ओपन 2022 स्पर्धेच्या (French open) जेतेपदाला गवसणी घातली आहे. 22 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून तो फक्त एक पाऊल दूर होता. नदालने 23 वर्षीय कॅस्पर रुदला (Casper Ruud) हरवलं. कॅस्पर रुदने सेमीफायनलमध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचला नमवून अंतिम फेरी गाठली होती. रुदची ही पहिलीच ग्रँड स्लॅम फायनल स्पर्धा होती. कॅस्पर रुद हा नॉर्वेचा टेनिसपटू आहे. क्ले कोर्टवर आज झालेल्या सामन्यात राफेल नदालने कॅस्पर रुदवर असा 6-3 6-3 6-0 सरळ सेटमध्ये विजय मिळवला. राफेल नदालने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून विक्रमी 21 व्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच जेतेपद पटकावलं होतं. त्याची दुसऱ्या विजेतेपदावर नजर होती.

सेमीफायनलचा सामना पूर्ण झाला नव्हता

नदाल आणि जर्मन खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात शुक्रवारी खेळलेला उपांत्य फेरीचा सामना अपूर्ण राहिला. दुसऱ्या सेटमध्ये अँडीला झालेल्या दुखापतीमुळे झ्वेरेव्हला बाहेर पडावे लागले आणि तो पुन्हा कोर्टवर येऊ शकला नाही. त्यामुळे नदालने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

फ्रेंच ओपनमध्ये एकही फायनल हरलेला नाही

लाल मातीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत राफेल नदाल अजूनपर्यंत एकही फायनल हरलेला नाही. आतापर्यंत 13 वेळा तो या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला व जेतेपदाला त्याने गवसणी घातली. 2020 मध्ये इथे क्ले कोर्टवर नदालने अंतिम फेरीत धडक मारुन विजेतेपद पटकावलं होतं. मागच्यावर्षी सेमी फायनलमध्ये नदाला पराभवाचा सामना करावा लागला होता. नदाल आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता. कारण नदाल हा लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जातो.

नोव्हाक जोकोविचचा अडथळा पार केला

त्याच्या 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांपैकी 13 विजेतेपद त्याची फ्रेंच ओपन स्पर्धेतील आहेत. क्वार्टर फायनलमध्ये राफेल नदालने वर्ल्ड नंबर 1 नोव्हाक जोकोविचवर 6-2, 4-6, 6-2, 7-6, असा विजय मिळवला होता.

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.