Gautam Gambhir | विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर

गौतम गंभीरने विराट कोहलीवर (Virat Kohli) याआधी अनेकदा टीका केली आहे.

Gautam Gambhir | विराटच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत कधीच बोललो नाही : गौतम गंभीर
विराट कोहली आणि गौतम गंभीर
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:40 PM

मुंबई : “मी केव्हाही विराट कोहलीच्या एकदिवसीय आणि कसोटीमधील नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. तसेच मी कधीही विराटच्या (Virat Kohli) वनडे किंवा टेस्ट क्रिकेटमधील नेतृत्व गुणांवर शंका घेतली नाही. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया यशस्वी कामगिरी करेल”, अशा शब्दात टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir)  चक्क विराटचं कौतुक केलं आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित होता. गंभीरला विराटच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस गंभीरने हे उत्तर दिलं. (Gautam Gambhir praises Team India captain Virat Kohli)

गंभीर काय म्हणाला?

“मी नेहमीच विराटच्या टी 20 मधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विराटच्या कॅपटन्सीमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे. टीम इंडिया कधीच 2-3 खेळाडूंवर अवलंबून राहिला नाही. कोहलीनेही यासंदर्भातील वक्तव्य अनेकदा केलं आहे, ” असंही गंभीरने यावेळेस स्पष्ट केलं. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात आयपीएलच्या 13 व्या मोसमात विजेतेपद मिळवून दिले. यानंतर विराटऐवजी रोहित शर्माला टीम इंडियाच्या टी 20 मधील कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात यावी, अन्यथा हे टीम इंडियासाठीच नुकसानकारक ठरेल, असं गंभीर म्हणाला होता.

तेव्हा गंभीर काय म्हणाला होता?

“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर ते टीम इंडियासाठी नुकसानाचं असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते निकष आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत”असं गंभीर म्हणाला होता. “तसेच कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान संधी मिळावी. जेणेकरुन दोघांची तुलना करताना एकच निकष लावता येईल”, असं गंभीर म्हणाला होता.

दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराटचे संघात पुनरागमन झालं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या कसोटी मालिकेला चेन्नईत सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : विराट कोहली धोनीसारखा दबाव हाताळू शकत नाही : गौतम गंभीर

IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर

PHOTO | विराटच्या तुलनेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम, रोहितला टी 20 च्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : गौतम गंभीर

(Gautam Gambhir praises Team India captain Virat Kohli)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.