25 चेंडूत शतक, सलग सहा षटकार, मैदानात धावांचा पाऊस

स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्स मुंसे याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन या संघाकडून खेळताना त्याने केवळ 25 चेंडूत शतक ठोकत विश्वविक्रम केलाय. शिवाय याच सामन्यात त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचाही विक्रम नावावर केला. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन आणि बाथ सीसी यांच्यात झालेल्या अनौपचारिक टी-20 सामन्यात मुंसे याने 39 चेंडूत 147 धावांची धडाकेबाज खेळी …

25 चेंडूत शतक, सलग सहा षटकार, मैदानात धावांचा पाऊस

स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्स मुंसे याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन या संघाकडून खेळताना त्याने केवळ 25 चेंडूत शतक ठोकत विश्वविक्रम केलाय. शिवाय याच सामन्यात त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचाही विक्रम नावावर केला. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन आणि बाथ सीसी यांच्यात झालेल्या अनौपचारिक टी-20 सामन्यात मुंसे याने 39 चेंडूत 147 धावांची धडाकेबाज खेळी केली.

मुंसेसोबतच त्याचा साथीदार जीपी विलोजनेही 53 चेंडूत शतक ठोकलं. मात्र मुंसेची कामगिरी खास होती. कारण, त्याच्या षटकारांचा पाऊस हा चर्चेचा विषय ठरला होता. त्याने या खेळीत एकूण पाच चौकार आणि तब्बल 20 षटकार ठोकले.

मुंसेने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर त्याने पुढच्या 50 धावा केवळ 8 चेंडूत केल्या. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हनने या दोन फलंदाजांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 20 षटकांमध्ये 3 बाद 326 धावा केल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *