AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यालाच जाऊन विचारा ! रोहितच्या दुखापतीबाबतच्या प्रश्नावरुन ‘दादा’ भडकला

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

त्यालाच जाऊन विचारा ! रोहितच्या दुखापतीबाबतच्या प्रश्नावरुन 'दादा' भडकला
| Updated on: Nov 13, 2020 | 11:22 PM
Share

मुंबई : हिटमॅन रोहित शर्मा, टीम इंडियाचा (Rohit Sharma)तडाखेबाज फलंदाज. आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पंजाबविरुद्धच्या साखळी सामन्यात 18 ऑक्टोबरला रोहितला दुखापत झाली. त्याला मांडीच्या स्नायूंचा त्रास झाला. यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडही करण्यात आली नाही. यावरुन निवड समितीवर क्रिकेटचाहत्यांनी टीकेची झोड उठवली. दुखापतग्रस्त असतानाही तो आयपीएलमध्ये खेळतोय, मग तो अनफिट कसा, असे प्रश्न निवड समिती आणि पर्यायाने बीसीसीआयला विचारण्यात आले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे दोघे वादाच्या भोवऱ्यात फसले. दोघांना रोहितच्या दुखापतीबाबत प्रत्यक्ष प्रश्न विचारले गेले. मात्र पुन्हा रोहितसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत दादा भडकला. रोहितलाच जाऊन विचारा, असं उत्तर सौरव गांगुलीने दिलं. go and ask him bcci president sourav ganguly was outraged by the question of rohit sharma injury

“रोहितच्या प्रकृतीवर बीसीसीआय देखरेख करतेय. मेडिकल रिपोर्टनुसार, रोहितने गडबडीत मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला, तर दुखापत वाढेल”, असं रवी शास्त्री म्हणाले होते. त्यानंतरही रोहित मुंबईसाठी खेळला. मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवरुन नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले. यावरुन रोहित तंदुरुस्त असल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे रोहित खेळत असतानाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड का केली नाही, रोहितची निवड न करण्यामागे काही राजकारण आहे का, अशी चर्चाही सुरु झाली. यासर्व प्रकारानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही बदल केले गेले. यामध्ये रोहितची फक्त कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. रोहितच्या निवडीचा मुद्दा थोड्या प्रमाणात निवळला. मात्र पुन्हा रोहित प्रकरणाने डोकं वर काढलं आहे. रोहित पूर्णपणे दुखापतीतून सावरला नाही, असं वक्तव्य खुद्द सौरव गांगुलीनेच केलं आहे.

गांगुली काय म्हणाला?

“आताही रोहित पूर्णपणे दुखापतीतून सावरला नाहीये. रोहित 70 टक्केच दुखापतीतून सावरला आहे, असं गांगुली म्हणाला. गांगुलीने ‘द वीक’ ला मुलाखत दिली. गांगुलीने या मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केलं. रोहितकडेच त्याच्या दुखापतीबाबत चौकशी करायला हवी. त्याच्या दुखापतीबाबत तुम्ही रोहितलाच का नाही विचारत? रोहितला दुखापतीमुळेच एकदिवसीय आणि टी 20 मध्ये स्थान देण्यात आलं नाहीये”, असं गांगुली म्हणाला. अशाप्रकारचं वृत्त इसपीएन-क्रिकइन्फोने ‘द वीक’ला गांगुलीने दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्याने दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळण्यात आला. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू थेट यूएईहून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. मात्र रोहित शर्मा टीमसोबत गेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत रोहित मुंबईत राहणार आहे. यानंतर तो बंगळुरुला फिटनेस टेस्टसाठी जाणार आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

go and ask him bcci president sourav ganguly was outraged by the question of rohit sharma injury

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.