Happy Birthday Sunil Gavaskar : मैदानातच केस कापले, फाटकी ट्राऊजर्स घालून सेंच्युरी; ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्करबद्दल कोणालाच माहिती नसलेल्या 10 गोष्टी

Happy Birthday Sunil Gavaskar : आउट करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन... सांगायचं झालं तर क्रिकेट विश्वात ‘लिटिल मास्टर’ म्हणून देखील सुनील गावस्कर यांची ओळख आहे. .. ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्करबद्दल कोणालाच माहिती नसलेल्या 10 गोष्टी,

Happy Birthday Sunil Gavaskar : मैदानातच केस कापले, फाटकी ट्राऊजर्स घालून सेंच्युरी; ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्करबद्दल कोणालाच माहिती नसलेल्या 10 गोष्टी
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 1:30 PM

Happy Birthday Sunil Gavaskar : भारतीय टीमचे माजी कर्णधार आणि लीजेंड सुनील गावस्कर आज 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सांगायचं झालं तर क्रिकेट विश्वात ‘लिटिल मास्टर’ म्हणून देखील सुनील गावस्कर यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड बनवलेत. आजही त्यांच्या फिटनेसपुढे तरुण फेल आहे. सुनील गावस्कर यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे सुनील गावस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

सुनील गावस्कर यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे जन्माच्यावेळी रुग्णालयात सुनील गावस्कर यांची बदली झाली होती. याचा घटनेचा उल्लेख ‘सनी डेज’ या पुस्तकात करण्यात आला आहे. सुनील गावस्कर यांच्या जन्मानंतर त्यांच्या काकांनी गावस्कर यांच्या कानावर एक बर्थमार्क पाहिला होता. दुसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर तो बर्थमार्क त्यांच्या कानावर नव्हता..

अशात सुनील गावस्कर यांच्या काकांनी डॉक्टरांना सांगितलं. संपूर्ण रुग्णालय शोधून काढल्यानंतर नर्सने एका मच्छीमाराच्या पत्नीच्या शेजारी गावस्कर यांना ठेवलं होतं. तेव्हा जर काकांचं लक्ष गेलं नसतं तर. आज गावस्कर काय करत असते? हा विचार करण्याचा विषय आहे.

सुनील गावस्कर असे एकमेव क्रिकेटर आहेत ज्यांनी चार पुस्तकं लिहिली आहेत. सुनील गावस्कर यांनी ‘सनी डेज’, ‘आयडल्स’, ‘रन्स एन रुइंस’ आणि ‘वनडे वंडर्स’ अशी चार पुस्तकं लिहिली आहेत. सुनील गावस्कर यांनी मराठी ‘सावली प्रेमाची’ सिनेमात मुख्य भूमिका देखील साकारली आहे. शिवाय सिनेमा यांनी 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘मालामाल’ सिनेमात देखील लहान भूमिका साकारली आहे.

सुनील गावस्कर एक गोष्ट अनेकांना माहिती असेल, 1974 मध्ये सुरु असलेल्या सामन्यादरम्यान, सुनील गावस्कर बॅटिंग करत होते. तेव्हा त्यांचे मोठे-मोठे केस सतत त्यांच्या डोळ्यासमोर येत होते. अशात सुनील गावस्कर यांनी डिकी बर्ड यांच्याकडे केस कापण्याची विनंती केली. त्या सामन्यात सुनील गावस्कर यांनी शतक पूर्ण केलं होतं.

गावस्कर यांनी त्यांच्या पुस्तकात मोठा खुलासा केला आहे. गावस्कर पहिला सामना अशोक मांकड यांच्यासोबत खेळत होते आणि ते प्रचंड घाबरले होते. घाबरलेल्या अवस्थेत गावस्कर यांनी धावून दोन रन्स पूर्ण केले. पण अंपायरने लेग बाय दिलं नाही, तेव्हा ते हैराण झाले.

सुनील गावस्कर असे एकमेव क्रिकेटर आहेत, ज्यांनी ट्राऊजर्स घालून सेंच्युरी पूर्ण केली. सामना सुरु असताना सुनील गावस्कर यांची ट्राऊजर्स फाटली होती. तेव्हा ट्राऊजर्स न बदलता सुनील गावस्कर यांनी सेंच्युरी पूर्ण केली.

सुनील गावस्कर यांनी कधी आकड्यांकडे लक्ष दिलं नाही. याच कारणामुळे त्यांना अनेकदा विचित्र परिस्थितींचा देखील सामना करावा लागला. जेव्हा सुनील गावस्कर यांनी 29 शतक पूर्ण केले होते तेव्हा देखील वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती. 29 शतक पूर्ण करत सुनील गावस्कर यांनी सर डॉन ब्रॅडमॅनची बरोबरी केली होती.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इमरान खान यांच्यानुसार, त्यांनी ज्या फलंदाजांसाठी गोलंदाजी केली आहे. त्यापैकी सुनील गावस्कर यांनी बाद करणं सर्वात कठीण होतं. सुनील गावस्कर यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे, सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत 4 शतकांच्या मदतीने 774 धावा केल्या.

सुनील गावस्कर हे वेस्ट इंडिजचे क्रिकेटर रोहन कन्हाई यांचे फार मोठे फॅन होते. त्यामुळे सुनील गावस्कर यांनी त्यांच्या मुलाचं नाव देखील रोहन ठेवलं.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.