Hardik Pandya: ज्याची भीती होती तेच घडलं, हार्दिक पंड्याबाबत धडकी भरवणारी बातमी समोर, काय घडलं?
Hardik Pandya Comeback: हार्दिक पंड्याचे कमबॅक कधी होणार अशी आशा सर्व चाहते लावून बसलेली असताना एक बातमी आली आणि चाहत्यांचा हिरमोड झाला

टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंच्या समस्या संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन तंदुरुस्त होऊ न शकल्याने, १२ ते १३ खेळाडू जखमी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आणि त्यानंतर बुमराह तंदुरुस्त होऊन परतला आहे. मात्र, हार्दिक पांड्याच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत आणि आयपीएल २०२६ हंगाम संपल्यापासून तो अद्याप मैदानात परतलेला नाही. आता हार्दिक पांड्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ज्यानुसार ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्याला भारत ‘अ’ संघातून वगळले जाऊ शकते. आयपीएल २०२६ हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखण्याचा सतत त्रास होत होता. यामुळे तो आयपीएलमधील चार सामन्यांमधून बाहेर राहिला. त्यानंतर तो तंदुरुस्ती मिळवण्यासाठी बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला, परंतु सरावाच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्या मांडीच्या स्नायूंना (क्वाड्रिसेप्स) दुखापत झाली. हॅमस्ट्रिंगलाही दुखापत झाल्याने हार्दिक पांड्याला इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडावे लागले.
आयपीएल २०२६ च्या हंगामापासून हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही वगळण्यात आले होते. त्यानंतर, जेव्हा बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाचा एकदिवसीय संघ जाहीर केला, तेव्हा हार्दिक पांड्याच्या नावाचा समावेश तंदुरुस्तीच्या अटीवर करण्यात आला होता. हार्दिक तंदुरुस्त होण्याच्या जवळ पोहोचला असतानाच, टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार त्याच्या उजव्या पायाच्या नडगीच्या हाडाला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर हार्दिकला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. यामुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून हार्दिक बाहेर पडेल. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी त्याला तंदुरुस्त व्हायचे होते, परंतु या दुखापतीमुळे त्याच्या पुनरागमनाला आणखी विलंब झाला आहे. हार्दिकच्या जागी सूर्यांश शेडगेचा भारत ‘अ’ संघात समावेश केला जाऊ शकतो.
