LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?

Harsha Bhogle : ट्वीटरवर जयदेव नंदी या युजरनं लाईव्ह चर्चेचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?
हर्षा भोगले यांना काय झालं?
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Mar 24, 2022 | 10:47 PM

मुंबई : काय झालं हर्षा भोगले यांना, असा प्रश्न सध्या सगळेजण विचारत आहेत. हर्षा भोगले यांच्या एका व्हिडीओनं सध्या सोशल मीडियात (Social Media) गदारोळ माजलाय. एका लाईव्ह चर्चेदरम्यान, हर्षा भोगले (Harsha Bhogle) हे अचानक गायब झाल्यानं कार्यक्रमातील सूत्रसंचालही गोंधळून गेला होता. या संपूर्ण प्रकरानं ही चर्चा पाहणारे चाहतेही गोंधळून गेले होते. नेमका झालं तरी काय असा प्रश्न सूत्रसंचालकासह सगळ्यांना पडला होता. प्रसिद्ध कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एकाच लाईव्ह (Live session with Harsha Bhogle) चर्चेत भाग घेतला होता. सूत्रसंचालकानं हर्षा भोगले यांना प्रश्न विचारला. आगामी आयपीएल दरम्यान, नेमका कोणता संघ सर्वाधित मजबूत संघ म्हणून पुढे येईल, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हर्षा भोगले यांनी सुरुवातही केली होती. मात्र अचानक मध्येच काहीतरी झालं. हर्षा भोगले यांचा कॅमेरा लाईव्ह चर्चे दरम्यान, अस्थिर झाल्याचं बघायला मिळालं. यानंतर काळजी वाहणारे आवाज लाईव्ह व्हिडीओ दरम्यान ऐकू आले आहेत. यानं सूत्रसंचालकही गोंधळून गेला होता. नेमकं हर्षा भोगले यांना काही झालंय का? त्यांची प्रकृती स्थिर आहे ना? असा काळजीचा सूर आता हर्षा भोगलेच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून उपस्थित केलाय.

हर्षा भोगले ठीक आहेत ना?

ट्वीटरवर जयदेव नंदी या युजरनं लाईव्ह चर्चेचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. एका लाईव्हदरम्यान अचानक हर्षा भोगले यांना काहीतरी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. या व्हिडीओमुळे अनेक सवालही उपस्थित झाले आहेत. हर्षा भोगले ठीक आहेत ना? त्यांना काही झालं तर नाही ना? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय. ‘कोण आलंय, कोण आता तुम्ही? कुठून आला आहात?’ असे प्रश्न ऐकू आलेत. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.

पाहा तो व्हायरल व्हिडीओ : लाईव्ह चर्चेदरम्यान, काय घडलं?

दरम्यान, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी हर्षा भोगले यांना टॅग करत ते ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. हाच व्हिडीओ हर्षा भोगले यांनी रिट्वीट करत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, असं स्पष्ट केलंय.

सुनंदन लेले यांचं ट्वीट

आयपीएलचा यंदाचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या आयपीएलमध्ये अनेक नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांच्या आणि क्रीडा तज्ज्ञांच्या चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका लाईव्ह शो दरम्यान, घडलेल्या या प्रकारामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, नेमकं या लाईव्ह शो दरम्यान, हर्षा भोगले यांना काय झालं होतं, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र मोबाईल पडल्यानंतर ऐकू आलेले आवाज धडकी भरवणारे आहेत.

दरम्यान, यानंतर आता हर्षा भोगले यांनीही ट्वीट करत आपण ठीक असल्याचं म्हटलंय. चाहत्यांनी व्यक्त केलेल्या काळजीनं आपण भारावून गेलो असल्याचंही त्यांनी म्हटलंय. व्हायरल व्हिडीओमुळे हर्षा भोगले यांनी अखेर स्पष्टीकरण दिल्यानंतर चाहत्यांच्याही जीवात जीव आला आहे.

वाचा हर्षा भोगले काय म्हणाले?

संबंधित बातम्या :

Byju’s बनली फीफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची अधिकृत स्पॉन्सर

कॅप्टनशिप सोडण्याच्या धोनीच्या निर्णयामागची Inside Story, CSK च्या सीईओंनी सांगितलं काय घडलं?

असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें