लव्ह यू जानू, तू नीच… तरीही शेवटच्या क्षणापर्यंत निभावलं नातं; रात्री ३ वाजता शम्मी विरोधात हसीन जहांची पोस्ट
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां वेगळे झाले आहेत. आता हसीन जहांने सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची विभक्त झालेली पत्नी, मॉडेल हसीन जहां यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मोहम्मद शमी यांना हसीन जहां आणि त्यांच्या मुलीला दरमहा 4 लाख रुपये भरणपोषण भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, शमी यांना हसीन जहां यांना दरमहा 1.5 लाख रुपये आणि त्यांच्या मुलीला 2.5 लाख रुपये द्यावे लागतील.
या निर्णयानंतर हसीन जहां यांनी प्रथमच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी इन्स्टाग्रामवर उर्दू आणि हिंदी भाषेत एक पोस्ट लिहिली असून त्यासोबत एक सविस्तर नोट देखील जोडली आहे. ‘आय लव्हयू जानू. कोणतीही पत्नी माझ्यासारखे नाते निभावणार नाही. लव्ह तू काळजी करु नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत मी नाते निभवण्याचा प्रयत्न केला. गेली ७ वर्षे आपण भांडत आहोत. पण चारित्रहीन, स्वार्थी, नीच मानसिकतेमुळे तू संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं’ असे हसीन जहां म्हणाली.
काय आहे हसीन जहांची पोस्ट?
हसीन जहां यांनी आपल्या लांबलचक पोस्टमध्ये लिहिले, त्यांनी क्रिकेटर शमी यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा उल्लेख केला आणि त्यांच्या वकिलाने कशी मदत केली याबद्दल सांगितले. अभिनेत्री आणि मॉडेल हसीन जहां यांनी लिहिले, ‘2018 ते 2025 हा प्रवास अत्यंत वेदनादायी राहिला आहे. पण सुदैवाने माझ्या सर्व प्रार्थनांना उत्तर मिळाले जेव्हा मी कलकत्ता उच्च न्यायालयातील वकील इम्तियाज अहमद यांना भेटले, जे केवळ एक उत्तम वकीलच नाहीत तर उदार हृदयाचे व्यक्ती देखील आहेत.’
वाचा: ‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?
View this post on Instagram
“सुरुवातीला मी त्यांच्याशी माझ्या आणि माझ्या मुलीविरुद्ध सूरी पोलीस ठाण्यात 17.05.2021 रोजी दाखल झालेल्या एफआयआरबद्दल चर्चा केली, जी मोहम्मद शमी यांनी उकसवलेल्या एका व्यक्तीने दाखल केली होती. त्यात कलम 341/323/307/406/34/504/120बी अंतर्गत आरोप होते. त्या क्षणी इम्तियाज भाई यांनी खटला हाती घेतला आणि कलम 482 सीआर.पीसी अंतर्गत अर्ज दाखल करून ही संपूर्ण कारवाई रद्द करण्याची मागणी माननीय न्यायालयासमोर मांडली. 08.10.2024 च्या आदेश आणि निर्णयानुसार, माननीय न्यायालयाने ही संपूर्ण कारवाई रद्द केली, जी पूर्णपणे खोटी आणि बनावट होती” असे म्हटले आहे.
पुढे म्हटले, “यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आणि मला जाणवले की अल्लाहने माझ्या खटल्यांचे रक्षण करण्यासाठी इम्तियाज अहमद यांना निवडले आहे. सुरुवातीला मी इम्तियाज भाई यांना पाहिले आणि मला वाटले की ते खूप मेहनती व आपल्या व्यवसायाप्रती समर्पित आहेत. अलहम्दुलिल्लाह, नंतर जसजसे दिवस पुढे गेले, तसतसे मला जाणवले की इम्तियाज भाई हे खऱ्या अर्थाने उदार हृदयाचे देवदूत आहेत.”
“त्यांनी माझ्या भरणपोषणाच्या खटल्याचा स्वीकार केला आणि माननीय न्यायालयात युक्तिवाद केला. आज मला या निर्णयाचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, पण मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि यशासाठी ईश्वराकडे प्रार्थना करेन. सत्यमेव जयते.” या लांबलचक पोस्टसह त्यांनी लिहिले, “इज्जत-जिल्लत देणारा फक्त अल्लाह आहे.”
हसीन जहां यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर युजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण शमी यांच्या बाजूने कमेंट करत आहेत, तर काहीजण हसीन जहां यांना पाठिंबा देत आहेत.