T20 World cup 2022 : न्यूझिलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, जाणून मॅचमधील महत्त्वाच्या गोष्टी
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करता आली नाही.

मेलबर्न : T20 विश्वचषक 2022 च्या (T20 World cup 2022) खऱ्या मॅचेसला (Matches) आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या सामन्यात न्यूझिलंडच्या (NZ) खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम 111 धावांवर बाद झाली. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीचं धुलाई झाली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोकण्यात त्यांना अपयश आलं.
डेव्हिड कॉनवेने न्यूझीलंडकडून खेळताना नाबाद 92 धावांची खेळी केली. त्यामध्ये त्याने 7 चौकार, 2 षटकार मारले. शेवटी, जिमी नीशमनेही 13 चेंडूत 26 धावा केल्या, त्यात त्याने 2 उत्तुंग षटकार ठोकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या टीमची 200 धावसंख्या झाली.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर एकाही खेळाडूला अधिक काळ चांगली कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलिया टीम
आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टीम डेव्हिड. मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
न्यूझीलंड टीम
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी. टिम साउथी. लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
