‘हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही…’, या फिरकीपटूच्या वक्तव्याने अनेकजण क्लीन बोल्ड, नवीन वादावर आता कोण घालणार पांघरूण

Off Spinner Ravichandran Ashwin on Hindi : भारताचा विख्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्वीन याच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचा तो म्हणाला. तामिळनाडूमधून हिंदीला विरोध तीव्र होत असताना त्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

'हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही...', या फिरकीपटूच्या वक्तव्याने अनेकजण क्लीन बोल्ड, नवीन वादावर आता कोण घालणार पांघरूण
आर. अश्विन काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 4:59 PM

भारताचा प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्वीन याच्या एका वक्तव्याने क्रीडा जगतातच नाही तर सगळीकडे काहूर माजले आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचा तो म्हणाला. तामिळनाडूमधून हिंदीला विरोध तीव्र होत असताना त्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे. समाज माध्यमावर त्याच्या वक्तव्याची एकदम चर्चा होत आहे. रविचंद्रन याने तामिळनाडूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

काय म्हणाला आर अश्विन?

हे सुद्धा वाचा

रविचंद्रन अश्विन याने यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जर कोणी इंग्रजी अथवा तामिळ भाषेबाबत जागरूक नसेल तर तो हिंदीत प्रश्न विचारण्यासाठी कोणी इच्छुक आहे का? असा सवाल त्याने केला. अश्विन असे म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये शांतता पसरली. रविचंद्रन अश्विन याच्या हिंदी भाषेच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांमध्ये चुळबुळ दिसली. त्यानंतर अश्विन म्हणाला की, मला हे स्पष्ट केले पाहिजे की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ही एक अधिकृत भाषा आहे.

हिंदी लादण्याचा आरोप

अश्विनीच्या वक्तव्यावर इतके काहूर का माजले असे अनेकांना वाटत असले तरी दक्षिणेतील राज्य त्यांची भाषिक ओळख टिकवून आहेत. त्यात तामिळनाडूतील सत्तारूढ डीएमकेसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकार दक्षिणेतील राज्यांवर हिंदी लादत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे अश्विनचे वक्तव्य एकदम चर्चेत आले आहे.

तुमच्या मार्गावर अढळ राहा

अश्विन याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याने या प्रवासातील अनेक रोचक तथ्य आणि त्याच्या शिक्षणाविषयीचे अनुभव सांगितले. त्याने कधीच पराभव स्वीकारू नका. तुमच्या मार्गावर अढळ राहा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. जर अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मला कोणी म्हटले असते की, मी कर्णधार होऊ शकत नाही तर मी अधिक मेहनत केली असती, असे त्याने सांगितले. त्याने विद्यार्थ्यांना ध्येयासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्याने कधीच थांबता कामा नये. विद्यार्थ्याने नवीन काही शिकणे बंद केले तर यशस्वी हा शब्द एखाद्या अलमारीतच शोभून दिसेल, असा तो म्हणाला.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.