AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबादमध्ये Formula 4 Indian Championship ला झेंडा, जागतिक दर्जाची स्पर्धा भारतात रंगणार

हैदराबादच्या माधापूर येथे 'फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप' चे उद्घाटन होत आहे. हैदराबाद येथे होणारी जागतिक दर्जाची एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट फेब्रुवारी 2022 मध्ये चार शहरांमध्ये होणार आहे.

हैदराबादमध्ये Formula 4 Indian Championship ला झेंडा, जागतिक दर्जाची स्पर्धा भारतात रंगणार
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 10:09 AM
Share

हैदराबाद : निजामाचे शहर, बिर्याणीचं शहर किंवा चारमिनारसारख्या ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेले शहर म्हणून हैदराबादची जगभर ख्याती आहे. आता हे शहर अजून एका कारणासाठी ओळखलं जाईल. कारण फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप ही स्पर्धा यावेळी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. (Hyderabad to host Formula 4 Indian Championship in February)

तेलंगणाचे आयटी उद्योग मंत्री आणि महापालिका प्रशासन, उद्योग आणि वाणिज्य मंत्री कलवकुंतला तारका रामा राव (Kalvakuntla Taraka Rama Rao) आणि दक्षिण भारतीय अभिनेता विशाल (Actor Vishal) यांच्यासह रविवारी हैदराबादच्या माधापूर येथे ‘फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप’ चे उद्घाटन होत आहे. हैदराबाद येथे होणारी जागतिक दर्जाची एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट फेब्रुवारी 2022 मध्ये चार शहरांमध्ये होणार आहे.

हैदराबाद शहर पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी F3 स्ट्रीट सर्किट शर्यतीला झेंडा दाखवला. ही स्पर्धा शहरातील आयकॉनिक केबल पुलापासून सुरू करण्यात आली आणि कार्यक्रमस्थळी संपली. रेसिंग प्रमोशनच्या सध्याच्या प्रयत्नांविषयी बोलताना रेसिंग प्रमोशनचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी म्हणाले की, “मोनॅको एक सार्वभौम शहर-राज्य असल्याने तिथे एफ 1 ड्रायव्हर्स तयार झाले आहेत आणि आपल्याकडे एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अनेक इच्छुक रेसिंग ड्रायव्हर्सना संधी देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही मोटरस्पोर्ट्सच्या दीर्घकालीन विकासामध्ये गुंतवणूक करण्यास आणि भारतातील रेसिंग ड्रायव्हर्ससाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत, रेसिंगचा पहिला सीझन फेब्रुवारी -22 रोजी नवी दिल्ली, चेन्नई, कोइंबतूर आणि हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा जगभरातील रेसिंग टॅलेटला आकर्षित करेल.

आरपीपीएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नवजीत गडोके पुढे म्हणाले, “आमची गुंतवणूक भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये क्रांती घडवून आणेल आणि मोटरस्पोर्ट्ससाठी जागतिक दर्जाची, समग्र इकोसिस्टम तयार करणे हे उद्दिष्ट आहे.

रेसिंग प्रमोशन्सची नवीन इनिंग देशभरात नियोजित स्पर्धांसह भारतातील दीर्घकालीन रेसिंग कल्चरच्या नवीन युगाची सुरुवात करेल. येत्या काही महिन्यांत, रेसिंग प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड FIA द्वारे प्रमाणित फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप आयोजित करेल. आरपीपीएल शहर आधारित लीगला “इंडियन रेसिंग लीग” च्या रूपाने Q1 2022 मध्ये पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे. तसेच हैदराबादमधील भारतातील पहिलं एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट देखील वेळापत्रकानुसार आहे!

आरपीपीएलचे जॉइंट एमडी, अरमान इब्राहिमदेखील लाँचिंगवेळी उपस्थित होते, ते यावेळी म्हणाले की, आपल्या मातीत जागतिक दर्जाची उपकरणे आणि रेसिंग कार्स पाहणे जबरदस्त आहे. आम्ही अखिलेश आणि नवजीत यांचे आमच्या कंपनीमध्ये स्वागत करतो, आणि चॅम्पियनशिपची एक सिरीज तयार करण्यास उत्सुक आहोत ज्यामुळे भारतीय ड्रायव्हर्स जागतिक स्तरावर, उच्च स्तरावरील स्पर्धेत उतरू शकतील आणि भारतीयांना मोटरस्पोर्ट जगात पॉवरफुल बनवतील.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020 वर कोरोनाचं सावट, उद्घाटन समारंभापूर्वीच कोरोनाबाधित आढळल्याने चिंता वाढली

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत अँडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला होता? ज्यानंतर बुमराह चवताळला, आश्विनने केला खुलासा

तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर संकट, PCB च्या अडचणीत वाढ

(Hyderabad to host Formula 4 Indian Championship in February)

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.