AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 Mens World Cup 2021 | भारताला धक्का बसण्याची चिन्हं, T20 वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवणार?

टी -20 वर्ल्ड कप 2021 भारतात नियोजित करण्यात आला आहे.

T20 Mens World Cup 2021 | भारताला धक्का बसण्याची चिन्हं, T20 वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवणार?
icc t 20 world cup
| Updated on: Dec 01, 2020 | 1:36 PM
Share

इस्लामाबाद : यंदाच्या वर्षी आयसीसी टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप (T 20 World Cup) स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे (Coronavirus) ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. यामुळे ही स्पर्धा 2021 मध्ये खेळण्यात येणार आहे. आयसीसीच्या या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. म्हणजेच या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करणार आहे. मात्र या स्पर्धेचं यजमानपद भारताऐवजी यूएईला (UAE) मिळू शकतं, असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricekt Board) सीईओ वसीम खान (Wasim Khan) यांनी केलं आहे. icc t 20 world cup 2021 india could be moved to uae, says pakistan ceo wasim khan

वसीम खान काय म्हणाले?

“2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल अनिश्चितता आहे. या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये केलं जाऊ शकतं, असं ही होऊ शकतं. इंग्लंड क्रिकेट संघ 2021 च्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजनही केलं जाणार आहे. यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचं सर्व चित्र स्पष्ट होईल”, असं वसीम खानने म्हटलं. खान एका युट्यूब चॅनेलशी बोलत होते. यादरम्यान त्यांनी याबाबत हे विधान केलं.

2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला

आयसीसीने कोरोना व्हायरसमुळे या वर्षी होणारी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केली. यामुळे आयसीसीने 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताला तर 2022 च्या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिलं आहे. तसेच 2023 मध्ये 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजनही भारतात करण्यात येणार आहे.

पुढील म्हणजेच 2021 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात खेळण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिझा आवश्यक आहे. या व्हिझाबाबत आयसीसी आणि बीसीसीआय यांच्याकडून लेखी आश्वासन मिळण्याची वाट पाहत आहोत, असंही खानने म्हटलं.

जून महिन्यात आशिया चषक

“मागील आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. पुढील आशिया कप स्पर्धेचं आयोजन श्रीलंकेत केलं जाणार असल्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. ही स्पर्धा जून महिन्यात खेळण्यात येणार आहे. तसेच 2022 च्या आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचं मान पाकिस्तानला मिळणार आहे”, असंही खानने नमूद केलं.

संबंधित बातम्या :

T 20 Mens World Cup 2021 | T 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळणं हे सन्मानजनक : सौरव गांगुली

PHOTO | अतिशहाणपणा नडला, कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटवर कारवाई

icc t 20 world cup 2021 india could be moved to uae, says pakistan ceo wasim khan

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.