PHOTO | अतिशहाणपणा नडला, कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरवर कारवाई

या खेळाडूने एकूण 11 सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केलं आहे.

1/4
कोरोनामुळे सर्व खबरदारी घेऊन विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातंय. क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी संबंधित क्रिकेट बोर्डाकडून योग्य ती काळजी घेतली जाते.

2/4
मात्र एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने  कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या खेळाडूला स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे.

3/4
पाकिस्तानचा फिरकीपटू रझा हसनवर ही कारवाई करण्यात आली आहे. रझाने कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे त्याला सोमवारी देशाच्या स्थानिक मोसमातील उर्वरित सामन्यातून वगळण्यात आलं आहे.

4/4
रझा कायदे आजम स्पर्धेत नार्दंस सेकंड इलेवनचे प्रतिनिधित्व करत होता. रझाने वैद्यकीय पथकाच्या परवानगीशिवाय बायो बबल नियमाचं उल्लंघन केलं. या कारणामुळे रझावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. यामुळे आता रझाला या स्पर्धेला मुकावे लागले आहे.  रझा हसनने पाकिस्तानकडून 1 वनडे आणि 10 टी -20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 11 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत.

Published On - 11:30 am, Tue, 1 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI