AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विंडिजविरूद्धच्या सामन्यात दोन मोठे बदल, वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधानाचं कमबॅक

आयसीसीच्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा विंडिजविरूद्ध आहे. भारतीय संघाने दोन मोठे बदल केले आहेत.

विंडिजविरूद्धच्या सामन्यात दोन मोठे बदल, वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधानाचं कमबॅक
| Updated on: Feb 15, 2023 | 7:24 PM
Share

मुंबई : आयसीसीच्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा सामना विंडिजविरूद्ध आहे. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने दोन मोठे बदल केले आहेत. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना परतली आहे. यास्तिका भाटिया आणि हरलीन देओलला बाहेर बसवण्यात आलं आहे. वेस्ट इंडिजनेही करिश्मा रामहरैकला संधी देत संघात एक बदल केला आहे.

बोटाच्या दुखापतीमुळे स्मृती मंधाना पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये बाहेर होती. भारतीय महिला क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मंधाना खेळणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष लागून होतं.

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानचा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 7 विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 1 ओव्हरआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं.

स्मृतीला टी 20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे स्मृतीला पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याला मुकावं लागलं होतं.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध विंडिज, 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी

भारत महिला (प्लेइंग इलेवन): स्मृती मंधाना, शैफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका ठाकुर सिंह

वेस्टइंडीज महिला (प्लेइंग इलेवन): हेले मैथ्यूज (कप्तान), स्टैफनी टेलर, शेमेन कैंपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.