AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus | रिषभ पंतची ‘धोनी स्टाईल’, अगोदरच्या बॉलला अश्विनला सल्ला, दुसऱ्या बॉलवर वेडची विकेट!, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा विकेट कीपर रिषभ पंतने अगदी 'धोनी स्टाईल'ने आर अश्विनला मदत करत मॅथ्यू वेडचा अडथळा दूर केला.

Ind Vs Aus | रिषभ पंतची 'धोनी स्टाईल', अगोदरच्या बॉलला अश्विनला सल्ला, दुसऱ्या बॉलवर वेडची विकेट!, पाहा व्हिडीओ
| Updated on: Dec 26, 2020 | 10:57 AM
Share

मेलबर्नऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील (Border Gavskar Trophy) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना सुरुवातीपासून ठराविक अंतराने धक्के दिले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या 2 सत्रात चांगली गोलंदाजी केली.चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात आज विकेट कीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) धोनी स्टाईलने (MS Dhoni Style) फिरकीपटू आर. अश्विनला (R Ashwin) मदत करत फॉर्मात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅट्समन मॅथ्यू वेडला (mattew Wade) आऊट केलं. (Ind Vs Aus 2nd test match Rishabh pant in Dhoni Style helps R Ashwin)

दुसऱ्या कसोटीत मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाचा प्रारंभ केला. अगदी सुरुवातीपासूनच तो चांगल्या लयीत खेळत होता. सुरुवातीलाच आक्रमक खेळणं त्याने पसंत केलं. अगदी ठराविक अंतराने त्याने चौकार मारले. आज वेडच्या मनात काहीतरी वेगळं सुरु होतं हे एव्हाना विकेट कीपर रिषभ पंतने ओळखलं.

भारतीय बोलर्सच्या प्रत्येक बॉलवर फटका खेळण्याचा मॅथ्यू वेड प्रयत्न करत होता. बोलिंगसाठी आर अश्विन आला असता त्याच्या फिरकीवरही वेड मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करु लागला. मग रिषभ पंतने आर. अश्विनला बॉल स्टम्पच्या बाहेर न टाकता स्टम्पमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. अश्विनने पंतचा सल्ला ऐकला. अश्विनच्या त्याच चेंडूवर वेडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनचा बॉल अपेक्षेप्रमाणे टर्न होऊन उंच उडाला. जडेजानेही कुठलीही चूक न करता धावत जाऊन वेडचा कॅच पकडला.

रिषभ पंतच्या धोनी स्टाईलची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. वेडची विकेट पडल्यापासून पंतने सल्ला दिलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पंतचे चाहते त्याने धोनी स्टाईलने विकेट मिळवली म्हणून स्तुती करु लागले आहेत.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करण्यासाठी मॅथ्यू वेड मैदानात उतरला. अगदी सुरुवातीपासून त्याने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेडने 39 बॉलमध्ये 30 रन्स केल्या. यामध्ये त्याने तीन खणखणीत चौकार लगावले. परंतु अश्विन आणि पंतच्या बुद्धी चातुर्यासमोर वेडची चांगली इनिंग संपुष्यात आली. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा  136-5 अशी स्थिती होती.

संबंधित बातमी

Live : AUS vs IND, 2nd Test 1st Day | टीम इंडियाच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा, कांगारुंचा अर्धा संघ तंबूत 

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.