IND vs AUS Test : बीसीसीआयच्या अपीलनंतर आयसीसीनं इंदुर पिचबाबत दिला असा निर्णय, आता…

बॉर्डर गावसकर कसोटी मालिका नुकतीच पार पडली. मात्र या मालिकेत खेळपट्टीचा वाद चांगलाच रंगला. खासकरून इंदुर खेळपट्टीवरून आयसीसीने ताशेरे ओढले होते. त्यामुळे या मैदानावर कारवाई होण्याची शक्यता होती.

IND vs AUS Test : बीसीसीआयच्या अपीलनंतर आयसीसीनं इंदुर पिचबाबत दिला असा निर्णय, आता...
IND vs AUS : तिसऱ्या कसोटी सामन्यात इंदुर पिचबाबत रंगला होता वाद, आता आयसीसीनं असं काही केलं की... Image Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 1:30 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2-1 ने भारताने जिंकली खरी पण खेळपट्टीचा वाद अजूनही शमलेला नाही. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर न्यूझीलँडने श्रीलंकेला पराभूत करत भारताची अंतिम फेरीतील वाट मोकळी केली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. असं असलं तरी इंदुर खेळपट्टीच्या वादावर पडदा पडलेला नाही. आता बीसीसीआयच्या अपीलनंतर आयसीसीने इंदुर खेळपट्टीची रेटिंग बदलली आहे.

इंदुर कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच संपला होता. त्यामुळे आयसीसीने खराब खेळपट्टी असा शेरा दिला होता. त्यामुळे क्रिकेट जगतातून खेळपट्टीवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयने अपील केलं आणि आयसीसीने आपल्या निर्णयात बदल केला आहे. आता खराब ऐवजी चांगल्या पेक्षा कमी असा शेरा दिला आहे.

आयसीसीने 3 मार्चला खेळपट्टी खराब असल्याचं सांगितलं होतं.नव्या नियमानुसार क्रिकेट मंडळ अपील करू शकते. बीसीसीआयचे या निर्णयाविरोधात अर्ज केला आणि 14 दिवसातच निर्णय बदलण्यात आला. आयसीसीने तेव्हा खराब खेळपट्टी असा शेरा देताना 3 डिमेरिट गुण दिले होते. आता आयसीसीने चांगल्यापेक्षा कमी आणि 1 डिमेरिट गुण दिला आहे.

सामनाधिकारी ब्रॉडने आपल्या अहवालात खेळपट्टीबाबत लिहिलं होतं की, “खेळपट्टी खूपच सुकी होती. त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा होत नव्हता. ही खेळपट्टी सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना मदत करत होती. सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळपट्टीला खड्डे पडल्याचं दिसून आलं. असंच मधल्या काही वेळात होत होतं.यामुळे चेंडू सीम होत नव्हता. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त चेंडू उडत होता.

या अहवालानंतर आयसीसीने खेळपट्टी खराब असल्याचा शेरा दिला होता. यामुळ होळकर स्टेडियमवर बंदी लागण्याची शक्यता होती. आयसीसी नियमानुसार, जर सलग पाच वर्षे 5 डिमेरिट पॉईंट्स मिळाले तर त्या ठिकामी 12 महिने कोणताही आंतरराष्ट्राय सामना होत नाही. होळकर स्टेडियमला तीन डिमेरिट्स पॉईंट्स मिळाले होते. पुढच्या पाच वर्षात आणखी दोन डिमेरिट पॉईंट्स मिळाले असतं तर बंदी आली असती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच संपला होता.पहिल्या दोन दिवसात 30 गडी बाद झाले होते. तर संपूर्ण सामन्यात 31 गडी बाद जआल होते. त्यापैकी 26 गडी फिरकीपटूंच्या नावावर होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला होता.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.