AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई ती आईच! पोराच्या पदार्पण सामन्यावेळी मैदानात जात मारली घट्ट मिठी

नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीमधील एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यावर दोघा माय-लेकाचा फोटो जोरदार व्हायरल आहे.

आई ती आईच! पोराच्या पदार्पण सामन्यावेळी मैदानात जात मारली घट्ट मिठी
| Updated on: Feb 09, 2023 | 7:04 PM
Share

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेमधील भारताने  (IND vs AUS First Test Match) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या नागपूर कसोटीमध्ये भारताने वर्चस्व राखलं आहे. पहिल्या दिवशी कांगारूंचा 177 धावात खुर्दा पाडला. यामध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण करणाऱ्या सर जडेजाने आपली जादू दाखवून दिली. एकट्या जडेजाने 5 विकेट्स घेत संघाला अर्ध्या माघारी धाडत पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकललं. आजच्या सामन्यामध्ये भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोन खेळाडूंनी पदार्पण केलं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीमधील एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (KS Bharat Mother Pic)

हा व्हायरल होत असलेला फोटो दुसरा तिसरा कोणी नाहीतर भारताचा खेळाडू केएस भरतचा आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यावर दोघा माय-लेकाचा फोटो जोरदार व्हायरल आहे. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूची मेहनत फळाला आली होती. कोशिश करनो वालो की कभी हार नही होती…या वाक्याप्रमाणे केएसच्या जिद्द आणि चिकाटीला खऱ्या अर्थाने आज यश आलं होतं. संधी मिळाल्यावर त्या संधीचं सोनं त्याने केलंच.

केएसने आज पदार्पण केलं त्यावेळी त्याची आईसुद्धा नागपूरला होती. देशातून अकरा जणांमध्ये आपल्या लेकाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाल्यावर आईच्या आनंदाचा ठावठिकाणा राहिला नाही. थेट मैदानात जात आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि गालाचा मुका घेतला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकंच नाहीतर भरतने आपल्या अंगावर आईच्या आणि वडिलांच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे. कोना देवी असं भरतच्या आईचं नाव आहे.

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केएस भरतने आतापर्यंत 86 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 37.95 च्या सरासरीने एकूण 4707 धावा केल्या आहेत. त्यासोबतच याशिवाय त्याने 64 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याच्या एकूण 1950 धावा आहेत.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.