Ind Vs Aus : ‘हिटमॅन शो’ रोखण्यासाठी आमच्याकडे विशेष प्लॅन, ऑस्ट्रेलियन बोलर्सने रोहितला ललकारलं

ऑस्ट्रेलियन बोलर्स नॅथन लायनने भारताचा बॅट्समन रोहित शर्माला ललकारलं आहे.

Ind Vs Aus : 'हिटमॅन शो' रोखण्यासाठी आमच्याकडे विशेष प्लॅन, ऑस्ट्रेलियन बोलर्सने रोहितला ललकारलं
तिसरा दुहेरी शतक हिटमॅन रोहित शर्माने ठोकलं. त्यानेही दक्षिण आफ्रीका संघाविरोधात ऑक्टोबर, 2019 मध्ये 212 धावा केल्या होत्या. रांचीच्या मैदानात रोहितने हे शतक जडले होते.

सिडनीऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) संघात पुनरागमन केलं आहे. अशातच रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे विशेष प्लॅन आहे. रोहित जागतिक कीर्तीचा बॅट्समन आहे. त्यामुळे तो जेवढ्या लवकर आऊट होईल तितकं प्रतिस्पर्धी संघाला सोपं असतं. आम्ही त्याच्याविरुद्ध रणनिती बनवली आहे, असं ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने म्हटलं आहे. (Ind Vs Aus Nathan Lyon taunts Rohit Sharma)

रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधला खतरनाक बॅट्समन आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. त्याच्याविरुद्ध बोलिंग करण्याचं आम्हाला विशेष आव्हान असेल. परंतु त्यासाठी आम्ही विशेष रणनिती बनवली आहे. रोहितविरुद्ध आम्ही आम्हीलाच आव्हान दिलं आहे, असं नॅथन लायनने म्हटलं आहे.

सुरुवातीच्याच काही ओव्हरमध्ये आम्ही रोहित शर्मावर हावी होण्याचा प्रयत्न करु. रोहितच्या बॅटिंगला तसंच त्याच्या आक्रमक फटक्यांना आम्ही रोख लावला तर इतरही बॅट्समनना आम्ही स्वस्तात परतावून लावू शकू, हा आम्हाला विश्वास आहे, असं नॅथन लायनने म्हटलंय.

मैदानावर जास्तीत धावा कशा करता येतील, याकडे रोहितचं लक्ष असतं. मैदानावर खेळताना कोणत्याही प्रकारे हुल्लडबाजी करणं रोहितला पसंत नाही, हे अनेक वेळा सगळ्यांनी पाहिलंय. तो शांत पद्धतीने खेळून संघाला जास्तीत जास्त धावा कशा मिळवून देता येतील, याचा प्रयत्न करतो, अशी स्तुतीसुमने नॅथन लायनने रोहितवर उधळली.

रोहित शर्मा इज बॅक

मोठ्या प्रतिक्षेनंतर हिटमॅन रोहित शर्माचं टीम इंडियात पुनरागन झालं आहे. मयांक अग्रवालला विश्रांती देऊन रोहितला संघात स्थान देण्यात आलं आहे. रोहितच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. यामुळे रोहित या तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे टीम इंडियच्या समर्थकांचे लक्ष असणार आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी

(Ind Vs Aus Nathan Lyon taunts Rohit Sharma)

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd test | अश्विन-जाडेजा पुन्हा कांगारुंना नाचवणार, सिडनीचे पिच क्युरेटर काय म्हणतात?

Aus vs Ind 3rd Test | सिडनीच्या मैदानात येणाऱ्यांना मास्क बंधनकारक, प्रेक्षकांवर तगड्या दंडाची तरतूद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI