IND vs ENG Team Prediction : सलामीवीर-विकेटकीपर फिक्स, गोलंदाजीची धुरा कोणाकडे? अशी असेल Playing XI

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 1st) यांच्यात उद्यापासून 5 फेब्रुवारीपासून चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (m a chidambaram) पहिली कसोटी मॅच खेळवण्यात येणार आहे.

IND vs ENG Team Prediction : सलामीवीर-विकेटकीपर फिक्स, गोलंदाजीची धुरा कोणाकडे? अशी असेल Playing XI
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या निर्णयाची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 10:50 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. दरम्यान सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. टीम इंडियामध्ये तोडीस तोड खेळाडू आहेत. यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायही हा यक्षप्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर उभा आहे. त्यामुळे अद्याप प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान प्लेईंग इलेव्हनसाठी काही खेळाडूंना दावेदारी सिद्ध केली आहे, तसेच या सामन्यात यष्टीरक्षक कोण असणार? हा प्रश्नदेखील सुटला आहे. पंरतु या सामन्यात कोणकोणते गोलंदाज भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकेलेलं नाही. (Ind vs Eng Chennai Test : Team India’s Playing 11 Prediction For 1st Test)

सलामीवीर ठरले!

ऑस्ट्रेलियामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली भागीदारी केली. पण मयंक अग्रवालच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे सोपे नव्हते. आम्ही रोहित आणि गिल या सलामी जोडीला आणखी काही वेळ देणार आहोत. हे दोघे टीम इंडियाला चांगली सुरुवात देतील, असा आशावाद कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल टीम इंडियाचे सलामीवीर असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

कोहली-पुजारा-रहाणेमुळे मधली फळी मजबूत

भारतीय संघासमोर गेल्या काही काळात अनेक अडचणी आल्या परंतु भारताची मधली फळी कायम मजबूत राहिली आहे. कारण भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे हे तिघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे निवड समिती कर्णधार किंवा प्रशिक्षकांसमोर मधळ्या फळीची चिंता कधीही निर्माण झाली नाही.

रिषभ पंतला विकेटकीपर म्हणून पसंती

“पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कामगिरीसह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दावेदारी सिद्ध केली. पण रिद्धीमान साहाही प्रबळ दावेदार होता. पण पंतची दमदार फलंदाजी आणि विकेटकीपिंगमुळे त्याला संधी दिली जाईल. पंत चांगल्या मानसिक स्थितीत आहे. त्यामुळे आम्ही पंतलाच कंटिन्यू करत आहोत. आयपीएलनंतर त्याने फार चांगली कामगिरी केली. त्याने फिटनेसवर फार मेहनत घेतली”, अशा शब्दात विराटने पंतचं कौतुक केलं. विराट कसोटी सामन्याच्या पूर्व संध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता.

इशांत की सिराज?

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार आहे. तर बुमराहनंतर दुसरा प्रमुख गोलंदाज म्हणून ईशांत शर्मा किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इशांतच्या अनुपस्थितीत सिराजने भारतीय गोलंदाजीची एक बाजू चोखपणे सांभाळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या गाबा कसोटीत (चौथ्या कसोटी सामन्यात) तिसऱ्या डावात सिराजने 5 विकेट घेत त्याची ताकद सिद्ध केली आहे. तर ईशांत शर्मा टीम इंडियातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. या दोघांपैकी एकाची निवड करणं भारतीय कर्णधाराला जड जाणार आहे.

कुलदीप, सुंदर की अक्षर पटेल?

फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन भारतीय फिरकीची बाजू सांभाळणार आहे. त्याच्या साथीला दुसरा फिरकीपटू म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल या दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. चेन्नईमधील चेपॉकची खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल असे बोलले जात आहे.

डावखुऱ्या फिरकीपटूची निवड करणं प्रशिक्षक आणि कर्णधारासमोरचं मुख्य आव्हान असणार आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अश्विनची साथ देण्यासाठी कुलदीप यादवची निवड झाली तर तिसरा फिरकीपटू म्हणून सुंदर आणि अक्सर यापैकी एकालाच संधी मिळू शकते. अनेक क्रीडा तज्ज्ञांच्या मते भारतीय संघ चेन्नई कसोटी सामन्यात अश्विन, कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल.

अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

हेही वाचा

India vs England 1st Test Preview | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?

टीम इंडियाच्या बैठकीतही शेतकरी आंदोलनाची चर्चा, प्रत्येक खेळाडूने मत मांडलं : विराट कोहली

India vs England, 1st Test, Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी, कुठे?

(Ind vs Eng Chennai Test : Team India’s Playing 11 Prediction For 1st Test)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.