AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs ENG : …म्हणून भारतीय संघ इंग्लंडला चारी मुंड्या चित करणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकही सामना इंग्लंडला जिंकता येणार नाही, अशी भविष्यवाणी गौतम गंभीरने केली आहे. | IND Vs Eng Gautam Gambhir

IND Vs ENG : ...म्हणून भारतीय संघ इंग्लंडला चारी मुंड्या चित करणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी
Gautam Gambhir
| Updated on: Feb 04, 2021 | 8:04 AM
Share

नवी दि्लली : भारतीय टीम विरुद्ध इंग्लंड (Team India Vs England) यांच्यात उद्यापासून म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुुरवात होईल. पहिला सामना हा चेन्नईला होणार आहे. त्याअगोदर भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने (Gautam gambhir) भविष्यवाणी केली आहे. या सिरीजमध्ये भारतीय संघ इंग्लंडला चारी मुंड्या चित करणार, अशी भविष्यवाणी गंभीरने केली आहे. (IND Vs Eng Gautam Gambhir England team Will get Defeat By team India)

“टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकही सामना इंग्लंडला जिंकता येणार नाही. इंग्लंडच्या फिरकीपटूंमुळे त्यांना एकही कसोटी जिंकता येणार नाही. त्यांचे फिरकीपटू हे इंग्लंडचे वीक पॉईंट आहेत. 4 सामन्यांची मालिका टीम इंडिया 3-0 किंवा 3-1 च्या फरकाने जिंकेल”, असा अंदाज गंभीरने बांधला आहे.

“मला शक्यतो भविष्यवाणी करायला आवडत नाही. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की जिथे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल, हे सांगू शकत नाही. परंतु दोन्ही संघांकडे पाहिलं तर असं मला लक्षात येतं की पहिल्या दोन मॅचवर भारतीय टीम कब्जा करेल. तसंच ही सिरीज इंग्लंडसाठी खूपच कठीण असणार आहे. भारतीय संघ ही सिरीज अगदी सहजरित्या जिंकेल”, असा दावा गंभीरने केला आहे.

इंग्लंडचे फिरकीपटू ही त्यांची उणीव

इंग्लंडचे फिरकीपटू ही त्यांची उणीव आहे. इंग्लंडकडे असलेल्या फिरकीटूंच्या जोरावर ते विजय मिळवू शकत नाही. किंबहुना चेन्नईची विकेट ही फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे तिथे इंग्लंडचा निभाव लागणार नाही. भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला एकाही सामन्यात विजय मिळवून देतील असं वाटत नाही” असं गंभीरने म्हटलं आहे.

रुटसमोर आव्हानांना डोंगर

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. पण भारतात परिस्थिती वेगळी आहे. रुटसमोर या मालिकेत अनेक आव्हान असणार आहेत. ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विनने शानदार गोलंदाजी केली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा गोलंदाजांसमोर रुटला फलंदाजी करणं, हे नक्की चॅलेंजिग असेल” असं गंभीरने स्पष्ट केलं.

कर्णधार विराटचं कौतुक

“विराटच्या नेतृत्वात संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आणखी उल्लेखनीयकामगिरी करेल”, असं म्हणत गंभीरने चक्क टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. “मी कधीही विराटच्या वनडे आणि टेस्टमधील नेतृत्वाबाबत टीका केली नाही. फक्त टी 20 मधील कॅप्टन्सीबाबतच मी बोललो आहे”, असं गंभीरने स्पष्ट केलं.

(IND Vs Eng Gautam Gambhir England team Will get Defeat By team India)

हे ही वाचा :

VIDEO : फिल्डिंगदरम्यान खेळाडू टीशर्ट बदलण्यात व्यस्त, त्याचवेळी चेंडू आला आणि…..

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

वयात गोलमाल करुन खेळला, दणदणीत शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून दिला पण नंतर झाली ही शिक्षा….

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.