ना बोलर, ना फिल्डर, विराट कोहलीला टीममध्ये सगळे फलंदाजच हवेत?

इंग्लंड विरुदध टीम इंडियाची प्लेइंग 11 पाहिली असता अशी शंका येते की कर्णधार विराट कोहलीला संघात सगळेच खेळाडू बॅट्समन हवेत की काय? | Virat Kohli

ना बोलर, ना फिल्डर, विराट कोहलीला टीममध्ये सगळे फलंदाजच हवेत?
Virat kohli
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 4:19 PM

मुंबई इंग्लंड विरुदध टीम इंडियाची (England Vs India) प्लेइंग 11  (Playing 11) पाहिली असता अशी शंका येते की कर्णधार विराट कोहलीला (Virat kohli) संघात सगळेच खेळाडू बॅट्समन हवेत की काय…? संघात स्पेशल बोलर्स असावेत, असं विराट कोहलीला वाटत नाही. संघातल्या प्रत्येकाने म्हणजे बोलर्सने देखील रन्स करावेत, असं मत सध्या विराटचं झालं आहे. याच कारणामुळे भारतीय संघ सध्या असमतोल भासत आहे. हाच असमतोल संघ इंग्लंडविरुद्धच्या दोन पराभवाला कारणीभूत ठरलाय. भारतीय संघ जिंकेल तेव्हा असमतोलिविषयी जास्त चर्चा होत नाही मात्र हारल्यानंतर उणीवा समोर येतात. (Ind vs ENg indian Captain Virat kohli Want for All batsman Playing Eleven)

विराट गरजेपेक्षा जास्त फलंदाज खेळवतोय

अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी ट्वेन्टी सामन्याच्या तिन्ही सामन्याच्या प्लेइंग 11 वर एक नजर टाकली तर तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात येईल की युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार वगळता सगळे खेळाडू बॅटिंग करु शकतात. पहिल्या सामन्यात अक्षर पटेलपर्यंत फलंदाजी होती. दुसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरपर्यंत फलंदाजी होती. भारतीय क्रिकेट फॅन्सना या दोघांपासून काहीही आक्षेप नाहीय. हे दोन्ही खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. त्यांना संधीही मिळाली पाहिजे. पण विराट कोहली या दोघांबाबतीत काय रणनिती आखतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

‘शार्दुल इन, सैनी वेटिंग’, हे प्रकरण नेमकं काय सांगतं?

शार्दुल ठाकूरला देखील संघात खेळवण्यापाठीमागे देखील तो फलंदाजी करु शकतो, हाच विचार मनात ठेऊन विराटने त्याला संघात संधी दिली आहे. टी ट्वेन्टीत पाचमधले तीन स्पेशल बोलर्स मॅच सांभाळू शकतात किंबहुना मॅच मारु शकतात पण केवळ 2 स्पेशालिस्ट बोलर्स आणि 3 असे बोलर्स जे बॅटिंग करु शकतात… असं संघाचं संतुलन फार काळ टिकणारं नाही… बोलिंग तर करतोच पण बॅटिंग पण करतो, या समीकरणामुळेच शार्दूल ठाकूर संघात आहे. नाहीतर नवदीप सैनी त्याच्यापेक्षा चांगला जास्त पर्याय आहे.

टॉप ऑडर्सच्या निराशाजनक कामगिरीमुळे विराटचा जास्तीत जास्त फलंदाजांवर भर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाचे टॉप 4 बॅट्समन संघर्ष करत होते. यानंतरही इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेतही हेच चित्र पुन्हा दिसून आलं. कर्णधार विराट कोहली स्वतही बॅटिंग करताना संघर्ष करत असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियात तर त्याने एकच टेस्ट मॅच खेळली पण इंग्लंडविरोधात मोठी खेळी करण्यात विराटला यश आलं नाही. त्याने दोन अर्धशतक ठोकले पण सिरीजवर परिणाम करणारे ते दोन्हीही अर्धशतक नव्हते. भारतीय संघ आणि फलंदाजी चर्चेत राहिली ती रिषभ पंत, सुंदर आणि आर. अश्विनच्या बॅटिंगने.. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुंदर आणि अश्विनचे इंग्लडविरुद्धच्या सिरीजमध्ये कोहलीपेक्षाही अधिक रन्स होते.

बॅट्समन आणि बोलर्सचं संतुलन नाही

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने आपल्या नावाला साजेशा खेळी केल्या नाहीत. याचवेळी तळाच्या फलंजादांनी चांगली कामगिरी केली. याचमुळए विराटचा भरोसा सहा, सात आणि आठ नंबरला बॅटिंग करणाऱ्या फलंदाज/ ऑलराऊंडर्सवर आहे. भरोसा हवा का तर हो… एका कर्णधाराचा भरोसा हा हवाच पण त्याच्याबदल्यात संघात बॅट्समन आणि बोलिंगचं संतुलन देखील हवं.. तेच संतुलन सध्या दिसत नाही… (Ind vs ENg indian Captain Virat kohli Want for All batsman Playing Eleven)

हे ही वाचा :

स्टीव्ह स्मिथचं धोनीच्या पावलावर पाऊल, ‘या’ व्यवसायात पदार्पण

धोनीच्या नेतृत्त्वात बोलिंगमध्ये झंझावात, मात्र आई आणि बायकोच्या भांडणात करिअर संपलं

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.