AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार गडी तंबूत परतले, पंत आणि पांड्याच्या भागीदारीचं नवं वादळ, इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुतलं

मोईन अलीने मोठ्या शिताफीने कर्णधार विराट कोहलीला फिरकीच्या जाळ्यात ओढत क्लीन बोल्ड केलं. त्यावेळी भारतीय संघाची अवस्था ही 121 धावांवर 4 विकेट अशी अवस्था होती (Rishabh Pant and HardiK Pandya recover inning).

चार गडी तंबूत परतले, पंत आणि पांड्याच्या भागीदारीचं नवं वादळ, इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुतलं
| Updated on: Mar 28, 2021 | 4:50 PM
Share

पुणे : टीम इंडिया आणि इंग्लंड याच्यातील शेवटच्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली खेळी करत पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय संघाला जणू काही गळतीच लागली. अवघ्या 18 धावांच्या फरकात भारतीय संघाचे तीन मातब्बर फलंदाज बाद झाले. यामध्ये कर्णधार विराट कोहलीचादेखील समावेश होता. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला. मात्र, या दबावाला बळी न पडता ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांनी धू धू धूत सळो की पळो करुन सोडलं (Rishabh Pant and HardiK Pandya recover inning).

मोईन अलीने विराटची विकेट घेतली

मोईन अलीने मोठ्या शिताफीने कर्णधार विराट कोहलीला फिरकीच्या जाळ्यात ओढत क्लीन बोल्ड केलं. त्यावेळी भारतीय संघाची अवस्था ही 121 धावांवर 4 विकेट अशी होती. त्यामुळे भारतीय संघावर दबाव वाढला. पण या दबावाला बळी न पडता ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने डाव सावरला. दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली. ऋषभने 4 षटकार आणि 5 चौकार ठोकले. त्याने आपलं अर्धशतक साजरी केलं. अर्धशतकानंतरही त्याने आपली जबरदस्त फलंदाजी सुरुच ठेवली.

ऋषभ आणि हार्दिकने डाव सावरला

ऋषभ आणि हार्दिक पांड्याची जोडी मैदानावर सेट झाली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. त्यामुळे इंग्लिश गोलंदाजांच्या चिंता वाढल्या. त्यांच्या मनामधील भीती त्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसू लागली. मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. जॉस बटलरने अचूकपणे पंतचा झेल टिपला. त्यामुळे तो झेलबाद झाला. पंतने 62 चेंडूत 78 धावा ठोकल्या.

पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी

पंत आणि पांड्याने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. मात्र सॅम करनने ही जोडी फोडली. पंत तंबूत परतल्यानंतरही हार्दिक पांड्याने आपली फलंदाजी जारी ठेवली. त्याने आपलं अर्धशतक साजरी केली. त्याने 5 चौकार 4 षटके लगावले. पण बेन स्टोक्सने हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडवला. हार्दिकने 44 चेंडूत 64 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने चक्क सिक्स मारत आपलं खातं उघडलं (Rishabh Pant and HardiK Pandya recover inning)

हेही वाचा : भारताची धडाकेबाज सुरुवात, पण अवघ्या 18 धावात तीन शिलेदार तंबूत, टीम इंडियावर दबाव वाढला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.