England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सांगता करुन टीम इंडिया आता भारतात परतणार आहे. दरम्यान, आता इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 7:58 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India Tour of Australia) विजयी सांगता करुन टीम इंडिया आता भारतात परतणार आहे. दरम्यान, आता इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये आता कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या इंग्लंडच्या भारत दौऱ्याची आधीच घोषणा करण्यात आली होती. आता भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. (IND vs ENG Test sereies Ajinkya Rahane or Virat Kohli, who will likely lead Team India)

कसोटी मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून

इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा डे-नाईट असणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पॅटर्निटी लिव्ह संपली असून तो संघात पुनरागमन करणार आहे. परंतु या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोण असणार? असा सवाल काहीजण विचारत आहेत.

विराटचं पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळून कर्णधार विराट कोहली भारतात परतला होता. विराट कोहलीची पत्नी गर्भवती होती, अशा महत्त्वाच्या क्षणी पत्नीला मानसिक आधार देता यावा यासाठी विराट कोहलीने पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली भारतीय संघात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता. मात्र विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. तीनपैकी दोन सामने भारताने जिंकले तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडेच कसोटी संघाचं नेतृत्व सोपवावं, अशी मागणी काही क्रीडाप्रेमींकडून होत आहे. परंतु भारतीय संघाचं नेतृत्व आता पुन्हा एकदा विराट कोहलीकडे सोपवलं जाणार आहे, तर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीची टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल

संबंधित बातम्या

England Tour India | ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता इंग्लंडला लोळवण्यासाठी भारताचा तगडा संघ सज्ज

सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं

“सौ शहरी… एक संगमनेरी”, अहमदनगरी ‘अजिंक्य’साठी काँग्रेस नेत्याचं हटके ट्विट

जे धोनी-कोहली आणि द्रविडसाठी अशक्य ते रिषभ पंतने करुन दाखवलं

(IND vs ENG Test sereies Ajinkya Rahane or Virat Kohli, who will likely lead Team India)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.