ENG vs IND : आम्हीच लॉर्ड्स टेस्ट जिंकणार, टीम इंडियाचा हा खेळाडू पूर्ण कॉन्फिडन्ट, जिंकण्याचा टायमिंगही सांगितला
ENG vs IND : भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्स टेस्ट निर्णायक वळणावर आहे. विजयाच पारडं कुठल्या बाजूला झुकेल? हे आता कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. पण टीम इंडियाच्या एका खेळाडूने विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्याने जिंकण्याचा टायमिंगही सांगितला आहे.

जर तुम्ही टीम इंडियाचे फॅन असाल, तर विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तयार व्हा. इंग्लंडची टीम लॉर्ड्स टेस्ट गमावणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीय, शतक पूर्ण करणारा भारतीय टीमचा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हे म्हणतोय. टीम इंडियाच्या या ऑलराऊंडर स्पिनरने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्यादिवशी टीम इंडियाचा डंका वाजेल. इतकच नाही, त्याने कधी जिंकणार ती वेळही सांगितली. भारतीय टीम लॉर्ड्स टेस्ट जिंकून मालिकेत 2-1 ची विजयी आघाडी घेईल. मोठी गोष्ट म्हणजे वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाच्या विजयाची घोषणा इंग्लिश मीडिया ब्रॉडकास्टरच्या समोर केली.
वॉशिंग्टन सुंदरने इंग्लिश मीडिया ब्रॉडकास्टर स्काय स्पोर्ट्सला मुलाखत दिली. या टेस्ट मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदरने एक शतक पूर्ण केलं. त्या बद्दलही जाणून घ्या. तुम्ही म्हणाल लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 23 धावा करुन आऊट होणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची दुसऱ्या इनिंगमध्ये अजून फलंदाजी सुद्धा आलेली नाही. मग, त्याने शतक कसं झळकावलं?. हे शतक त्याच्या बॅटने नाही, तर बॉलने केलय. हे शतक धावांच नसून विकेटच आहे.
23 धावांवर आऊट मग सुंदरने शतक कधी केलं?
वॉशिंग्टन सुंदरने लॉर्ड्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 22 धावा देऊन 4 विकेट काढल्या. या सोबतच त्याने इंटरनॅशन क्रिकेटमध्ये विकेटच शतक पूर्ण केलं. हे यश मिळवणारा तो 25 वा भारतीय आहे. त्याने आतापर्यंत 102 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. यात टेस्टमध्ये 30 विकेट, वनडेत 24 आणि T20 मध्ये 48 विकेट सुंदरच्या नावावर आहेत.
कधी जिंकणार ती वेळही सांगितली?
लॉर्ड्स टेस्टमध्ये चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने इंग्लिश ब्रॉडकास्टर चॅनलसमोर मोठी घोषणा केली आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडिया इंग्लंडला हरवेल असं वॉशिंग्टन सुंदर पूर्ण आत्मविश्वासाने बोलला. त्यानंतर त्याला पुढचा प्रश्न विचारला कधीपर्यंत? त्यावर तो म्हणाला, टीम इंडिया लंच नंतर विजयी झालेली असेल. वॉशिंग्टन सुंदर या घोषणेनंतर चौथ्या दिवसाचा गोलंदाजीचा प्लान आणि जाडेजासोबतच्या जुगलबंदीवर बोलला.
ही मोठ्या सेलिब्रेशनची संधी
लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 193 धावांच लक्ष्य ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने 4 विकेट गमावून 58 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 135 धावांची गरज आहे. 6 विकेट बाकी आहेत. अख्खा पाचवा दिवस आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या मते टीम इंडिया विजयासाठी पूर्ण दिवसाची वाट पाहणार नाही. टीम इंडिया विजयाच्या इराद्याने व लवकरात लवकर सामना संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडिया जिंकली, तर मालिकेत 2-1 ची आघाडी मिळेल. ही मोठ्या सेलिब्रेशनची संधी असेल.
