IND vs PAK : शोएब अख्तरने PCB ची इज्जत काढली, शोएब मलिकने गाणं म्हटलं, ‘दिल के अरमां…’, VIDEO
IND vs PAK : आठ वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताच पराभव केला होता. टीम इंडियाने काल त्या पराभवाचा बदला घेतला. या पराभवाने पाकिस्तानात सन्नाटा पसरला. पण पाकिस्तानचे माजी क्रिकेटर्स आपल्याच टीमवर हसत होते, गाणी गात होते. माजी खेळाडूंच्या या Reaction साठी तुम्ही एकदा हे व्हिडिओ बघा.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दुबईत पाकिस्तानला भारताने सहा विकेटने हरवलं. या विजयामुळे भारतात सेलिब्रेशनचा माहोल आहे, पाकिस्तानात निराशा आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीज, शोएब मलिक आणि शोएब अख्तरने निराशा व्यक्त केली नाही. उलट मलिक आणि हफीज हसताना दिसले. शोएब अख्तर आपल्या टीमच्या पराभवावर म्हणाला की, मी अजिबात निराश नाहीय.
पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर्स शोएब मलिक आणि मोहम्मद हफीज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारताच्या विजयानंतर दोघे बोलताना दिसतायत. त्यावेळी शोएब मलिकने ‘दिल के अरमां आंसूओं में बह गए’ हे गाणं म्हटलं. त्यानंतर दोघे हसताना दिसले.
शोएब अख्तर बोलला की…
शोएब अख्तर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन म्हणाला, “तुम्ही म्हणालं मी निराश आहे. पण मी अजिबात निराश नाहीय. कारण मला माहित होतं, पुढे काय होणार?” शोएब अख्तरने पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जशी मॅनेजमेंट तसे खेळाडू असं तो म्हणाला. “ना खेळाडूंना काय माहित, ना मॅनेजमेंटला. त्यांना स्कील सेटची माहिती नाहीय. फक्त खेळायला गेले. काय करायचय हे कोणालाच माहित नव्हतं” अशी टीका शोएब अख्तरने केली.
View this post on Instagram
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. ‘सर्वात प्रतिक्षित सामन्याची परफेक्ट Ending. एका खरा नॉकआऊट’ असं सचिनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलय. सचिनने विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या बॅटिंगच कौतुक केलं. कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीच सुद्धा कौतुक केलं.
View this post on Instagram
कोहलीच शतक
भारताविरुद्ध या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. 50 ओव्हर्स सुद्धा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. 241 रन्सवर ते ऑलआऊट झाले. सऊद शकीलने सर्वात जास्त 62 धावा केल्या. कुलदीप यादवने 3 आणि हार्दिक पंडयाने 2 विकेट काढले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 43 व्या ओव्हरमध्येच सामना जिंकला. विराट कोहलीने नाबाद शतक झळकावलं. श्रेयस अय्यरने हाफ सेंच्युरी झळकवली. शुभमन गिल 46 धावांची इनिंग खेळला.
