AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : ध्रुव जुरेल इन टीम, या स्टार खेळाडूला बाहेर बसावं लागेल, पहिल्या टेस्ट आधी कोचकडून मोठी घोषणा

IND vs SA : ईडन गार्डन्समध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचआधी ध्रुव जुरेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलं. प्लेइंग-11 साठी त्याने आपला दावा मजबूत केला आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध जुरेलने दोन्ही इनिंगमध्ये त्याने शतकी खेळी केली होती.

IND vs SA : ध्रुव जुरेल इन टीम, या स्टार खेळाडूला बाहेर बसावं लागेल, पहिल्या टेस्ट आधी कोचकडून मोठी घोषणा
dhruv jurel Image Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 2:00 PM
Share

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये येत्या 14 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर टेस्ट सीरीज सुरु होत आहे. या टेस्ट मॅचच्या 48 तास आधी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 बद्दल मोठी घोषणा झाली आहे. अपेक्षा होती तसं घडताना दिसतय. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलला कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघात स्थान मिळेल. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. मॅचच्या दोन दिवस आधी टीम इंडियाचे सहाय्यक कोच रायन टेनडशकाटे यांनी ही घोषणा केली.

ईडन गार्डन्स स्टेडिअमवर बुधवारी 12 नोव्हेंबरला टीम इंडियाच्या दूसऱ्या प्रॅक्टिस सेशनआधी पहिली प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यात असिस्टेंट कोच टेनडेशकाटे यांनी प्लेइंग-11 बद्दल खुलासा केला ध्रुव जुरेलला खेळवण्याबद्दल असिस्टेंट कोचला विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “मला वाटतं की, आम्हाला कॉम्बिनेशन (प्लेइंग-11) ची चांगली आयडिया आहे. ध्रुव जुरेल मागच्या 6 महिन्यात ज्या प्रकारे खेळतोय. मागच्याच आठवड्यात बंगळुरुमध्ये त्याने दोन शतकं झळकावली होती. या आठवड्यात त्याचं खेळणं निश्चित आहे”

जुरेल कुठल्या दुसऱ्या खेळाडूच्या जागी खेळेल

ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून खेळणार नाही. कारण टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत या सीरीजद्वारे पुनरागमन करतोय. पंत विकेटकीपर असेल. जुरेल कुठल्या दुसऱ्या खेळाडूच्या जागी खेळेल. जुरेल इन टीम झाल्यानंतर युवा ऑलराउंडर नीतीश कुमार रेड्डीला बाहेर बसावं लागेल असं टेनडेशकाटे म्हणाले. नितीश याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजचा भाग होता. पण त्याला जास्त संधी मिळाली नाही.

टेनडेशकाटे काय म्हणाले?

टेनडेशकाटे यांनी अलीकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला. दुखापतीमुळे रेड्डीला तिथे एकही सामना खेळता आला नव्हता. “सर्व प्रथम विजयाची रणनिती बनवावी लागेल. नितीश बद्दल आमच्या विचारात काही बदल झालेला नाही. त्याला ऑस्ट्रेलियात जास्त संधी मिळू शकली नाही. पण सीरीजच महत्व लक्षात घेऊन सांगिन की, ज्या पद्धतीची परिस्थिती इथे आम्हाला मिळेल, त्यावरुन नितीश या टेस्टसाठी बाहेर बसाव लागू शकतं” असं टेनडेशकाटे यांनी सांगितलं.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.