AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे पहिला कसोटी सामना असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झाला. लंच ब्रेकनंतर भारतीय संघ मैदानात उतरला. 288 धावांच्या पुढे खेळताना भारताला अडचणींचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या फिरकीचा सामना करताना भारतीय संघ अडचणीत आला.

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 6:23 PM
Share

भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 गडी गमवून 288 धावांवर खेळत होता. पण या धावांचा पुढे खेळताना भारताच्या धडाधड सात विकेट पडल्या. भारताने अवघ्या 172 धावा करताना 7 विकेट गमवल्या आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव 12 आणि प्रसिद्ध कृष्णा 1 या धावसंख्येवर नाबाद तंबूत परतले. आता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय किती धावा करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

भारताकडून देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत ही जोडी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरली होती. पण पावसामुळे खेळपट्टीचा पूर्ण अंदाजच बदलून गेला होता. ऋषभ पंत चुकीचा फटका मारताना 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला केएल राहुल आला. रिटायर्ड हर्ट होऊन पहिल्या दिवशी 77 धावा करून गेला होता. त्या पुढे खेळताना त्या फक्त 5 धावा जोडल्या आणि 82 धावा करून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कलने 150 धावांचा पल्ला ओलांडत धावसंख्येत भर घातली. पण त्याचा खेळही 167 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेलकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण रवींद्र जडेजा 13 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती नाजूक झाली. असं असताना ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने डाव सावरल्याने भारताने मजबूत स्थितीत आला.

ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने सातव्या विकेटसाठी 66 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 68 चेंडूत 51 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर लगेचच मानव सुथारही 24 धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजचा खेळ 11 धावांवर आटोपला. त्यामुळे भारत सर्वबाद होतो की काय असा प्रश्न होता. पण कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी झुंज दिली. आता तिसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4, केशारा नुवांथाने 3 आणि असिथा फर्नांडोने 1 विकेट काढली.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?