ICC World Cup IndvsSA : विश्वचषकात भारताची विजयी सलामी, द. आफ्रिकेवर 6 विकेट्स राखून विजय

World Cup 2019 India vs South Africa विश्वचषकाच्या पहिल्या लढाईत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 50 षटकात 227 धावांत रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 228 धावांची गरज आहे.

ICC World Cup IndvsSA : विश्वचषकात भारताची विजयी सलामी, द. आफ्रिकेवर 6 विकेट्स राखून विजय

लंडन : सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर यंदाच्या विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्स राखत भारताने मात केली आणि या विश्वचषकातला पहिला विजय नोंदवला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा हा या विश्वचषकातील सलग तिसरा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा भारताने 6 विकेट्स राखून यशस्वी पाठलाग केला. रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 122 धावांचं योगदान दिलं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रोहित शर्माचं विश्वचषकातलं हे दुसरं शतक ठरलं. यापूर्वी 2015 च्या विश्वचषकात रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकलं होतं. 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला शिखर धवनच्या रुपाने पहिला धक्का लागला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला. लोकेश राहुल आणि रोहित शर्माने चांगली भागीदारी केली. पण 26 धावा करुन राहुल माघारी परतला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माने भारताला विजयाच्या जवळ नेलं.

विश्वचषकाच्या पहिल्या लढाईत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 50 षटकात 227 धावांत रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 228 धावांची गरज होती. यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादवसह सर्वच गोलंदाजांच्या टिच्चून गोलंदाजीमुळे, दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली.

Picture

रोहित शर्माचं अर्धशतक पूर्ण

05/06/2019,9:00PM
Picture

भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद

05/06/2019,7:34PM

भारताकडून चहलने सर्वाधिक 4 विकेट घेत विश्वचषकात नवा विक्रम नावे केला. त्याला बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी 2 तर कुलदीप यादवने एक विकेट घेत चांगली साथ दिली.

आयसीसी विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. इंग्लंडमधील साऊदम्पटन इथं हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप ड्युप्लेसी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागलं.  2019 च्या विश्वचषकातील भारताचा हा पहिलाच सामना होता. तर दक्षिण आफ्रिका तिसरा सामना खेळत आहे. दोन सामन्यात पराभव पत्करलेल्या आफ्रिकेचं मनोबल ढासळलं आहे, तर विराट ब्रिगेड विजयी सलामीसाठी सज्ज झाली होती.

त्यानंतर पाचव्या ओवरमध्ये बुमराने क्विंटन डिकॉक (10) बाद केलं.

  • या सामन्याच्या तिसऱ्या ओवरमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. फिरकीपटू जसप्रित बुमरा याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला बाद केलं. अवघे 6 धावा करत हाशिम आमला तंबूत परतला.

या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला धक्का बसला आहे. आफ्रिकेचे स्टार गोलंदाज डेल स्टेन आणि लुंगी नगिदी हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. डेल स्टेन दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे, तर नगिदी 10 दिवस खेळू शकणार नाही.

रेकॉर्ड्स दक्षिण आफ्रिकेसोबत, मात्र परिस्थिती भारतासोबत

मागील काही सामन्यात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका संघावर दबदबा राहिला आहे. मात्र, विश्वचषकातील सामन्याचा विचार केला असता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघावर नेहमीच वरचढ असल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 1992 पासून आत्तापर्यंत विश्वचषकासाठी 4 सामने खेळले गेले आहेत. या 4 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने तब्बल 3 सामन्यांमध्ये, तर भारताने केवळ 1 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारतीय संघ : 

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, केदार जाधव, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *