AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2027 साठी टीम इंडियाचं मोठं प्लानिंग, वर्षभर आधीच निवडले 20 खेळाडू

ODI World Cup 2027 India Squad : वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे. त्याच्या आयोजनासाठी अजून बराच वेळ आहे. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या निवड समितीने आधीच 20 खेळाडूंची निवड केली आहे.

ODI World Cup 2027 साठी टीम इंडियाचं मोठं प्लानिंग, वर्षभर आधीच निवडले 20 खेळाडू
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Mar 20, 2026 | 3:16 PM
Share

ODI World Cup 2027 India Squad : टीम इंडियाने नुकताच टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला. आता भारताची नजर पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपवर आहे. वनडे वर्ल्ड कप संदर्भात एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आलीय. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या सिलेक्टर्सनी ते 20 खेळाडू आधीच निवडलेत जे वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. अजून वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर असताना निवडकर्त्यांनी 20 खेळाडूंचं सिलेक्शन केलं आहे. आता आयपीएल दरम्यानही निवडकर्त्यांची त्या खेळाडूंवर नजर असेल.

आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडू आपपाल्या टीमला विजयी करण्यासाठी ताकद लावतील. त्याचवेळी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती एसएएस दास, आरपी सिंह, अजय रात्रा आणि प्रज्ञान ओझा यांचं त्या खेळाडूंवर लक्ष असेल. निवडकर्ते खेळाडूंच्या सामन्याच्यावेळी त्या स्टेडियममध्ये असतील. या सदस्यांना स्टेडियम आणि टीव्हीवरील सामने पाहण्याची जबाबदारी दिली आहे. आयपीएलची सुरुवात 28 मार्चपासून होतेय. टी20 वर्ल्ड कपचं आयोजन ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2027 मध्ये होईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहेत.

बीसीसीआयची काय इच्छा?

टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर मुंबईत राहतात. शिवसुंदर दास कोलकता येथे राहतात. आरपी सिंह आणि अजय रात्रा दिल्ली-एनसीआरमध्ये वास्तव्याला आहेत. ओझा आयपीएलचे काही सामने बंगळुरु आणि हैदराबाद येथे पाहू शकतात. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयची इच्छा आहे की, प्रत्येक निवडकर्त्याने आठवड्यातून कमीत कमी एक मॅच पहावी. जेणेकरुन दर आठवड्याला मैदानावर पाच सामने कव्हर होतील. 2027 वनडे वर्ल्ड कप आणि ऑलिंपिक खेळ लक्षात घेता आधीच 20 खेळाडू निवडले आहेत. याचा अर्थ यंदाच्या आयपीएलमधून कुठल्या नव्या स्टारला वर्ल्ड कपसाठी निवडणार नाही.

Follow Us
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.