AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

K L Rahul | आयपीएलमध्ये झंझावात, आता के एल राहुलकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मोठ्या अपेक्षा

केएल राहुलला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

K L Rahul | आयपीएलमध्ये झंझावात, आता के एल राहुलकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मोठ्या अपेक्षा
| Updated on: Nov 17, 2020 | 5:42 PM
Share

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Team India Tour Australia) सिडनीत पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. के एल राहुलने (K L Rahul)आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार फलंदाजी करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला. केएलला आयपीएल 2020 मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. केएलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी उपकर्णधार पदाची जबाबादारी देण्यात आली आहे. केएलकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयपीएलसारखीच धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार आहे. तसेच केएलसमोर या दौऱ्यात अनेक आव्हानंही असणार आहेत. india tour australia can k l rahul perform as well as ipl 2020 on australia tour

मागील दौऱ्यात सपशेल अपयशी

केएल मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे यावेळेस केएलसमोर आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान असणार आहे. केएलने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्येच कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. या पहिल्यात कसोटी मालिकेत केएलने शतक ठोकत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केएलला फार संघर्ष करावा लागला होता. केएल मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  3 कसोटीत खेळला होता. यापैकी त्याने 5 डावात फलंदाजी केली होती. मात्र त्याला या 5 पैकी एका डावात अर्धशतकही लगावता आलं नव्हतं. केएलने केवळ 11.40 च्या सरासरीने अवघ्या 57 धावा केल्या होत्या. तर टी 20 मध्येही त्याला विशेष करता आले नव्हते.

ऑस्ट्रेलियात वनडे खेळण्याची पहिलीच वेळ

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे रोहितऐवजी केएलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केएलची ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. खेळाडू आणि उपकर्णधार अशा दोन भूमिका केएल बजावणार आहे. त्यामुळे निश्चितच केएलवर दबाव असणार आहे. केएलने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 45.75 च्या सरासरीने 183 धावा केल्या आहेत. तर केएलने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 32 सामन्यात 47.65 च्या सरासरीने 1 हजार 239 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 7 अर्धशतकं लगावली आहेत.

यशस्वी विकेटकीपर

केएलने आतापर्यंत यशस्वीरित्या विकेटकीपरची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये पंजाबसाठी कर्णधारपदासह त्याने विकेटकीपरची भूमिका बजावली. यासह त्याने 14 सामन्यात 670 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. केएलने न्यूझीलंड दौऱ्यावर विकेटकीपरची भूमिका बजावली होती. त्यामुळे केएलकडे कर्णधार, खेळाडू आणि विकेटकीपर अशा तिहेरी भूमिकांचा अनुभव आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

चांगल्या कामगिरीची अपेक्षा

केएलने अखेरचा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खएळला होता. या अखेरच्या सामन्यात त्याने शतकी कामगिरी केली होती. तेव्हापासून केएल जबरदस्त कामगिरी करतोय. त्यामुळे यावेळेस केएलकडून दुप्पट अपेक्षा असणार आहेत.

असा आहे ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि थंगारासू नटराजन.

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour Australia | भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

Team India | टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, बीसीसीआयची घोषणा

india tour australia can k l rahul perform as well as ipl 2020 on australia tour

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.