India vs Australia 2020 | कसोटी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे विराटपेक्षा उत्तम : इयन चॅपल

पहिल्या कसोटीनंतर अजिंक्यला नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

India vs Australia 2020 | कसोटी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे विराटपेक्षा उत्तम : इयन चॅपल
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 3:11 PM

सिडनी :  टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबर म्हणजेच (India Tour Australia 2020) उद्यापासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी या तीनही फॉर्मेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचे नेतृत्व करतो. कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या जागी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सर्वोत्तम आहे, असं विधान ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी केलं आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित 3 कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. india vs australia 2020 ajinkya rahane is better than virat kohli as a test captain said ian chappell

चॅपल काय म्हणाले?

“भारतीय संघाला विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यच्या रुपाने एक सर्वोत्तम कर्णधार मिळाला आहे. जिथवर कर्णधारपदाचा प्रश्न आहे, मी अजिंक्यला काही वर्षांपूर्वी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना पाहिलंय. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. अजिंक्यच्या नेतृत्वामुळे मी प्रभावित झालो होतो”, असं इयन चॅपल म्हणाले. चॅपेल विंडीजचे दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग यांच्यासह एका युट्युब शोमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान ते बोलत होते.

“अजिंक्य फार सकारात्मक आणि आक्रमक आहे. जेव्हा खेळ नियंत्रणात होता, तेव्हा रहाणेने आक्रमक भूमिका घेतली. अजिंक्यने तडाखेदार फलंदाजी करत टीम इंडियाचा विजय आणखी सोपा केला. मात्र परत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकला. पण अजिंक्यने फटकेबाजी करत भारताला आपल्या नेतृत्वामध्ये भारताला विजयश्री मिळवून दिली”, असंही चॅपल म्हणाले. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 मध्ये बॉर्डर-गावस्कर मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेबद्दल चॅपल बोलत होते.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यादरम्यान कर्णधार विराट दुखापतग्रस्त झाला होता. विराटला दुखापत झाली तेव्हा मालिकेची स्थिती 1-1 अशी बरोबरीत होती. या दुखापतीमुळे अजिंक्यला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या सामन्यात अजिंक्यने आपल्या नेतृत्वात भारताला 8 विकेट्सने विजय मिळवू दिला होता. 2-1 सह टीम इंडियाने कांगारुंवर मात केली होती.

विराट पहिली कसोटीनंतर मायदेशी

विराट टीम इंडियाकडून फक्त एकच कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. यानंतर तो भारतात परतणार आहे. विराट जानेवारी महिन्यात बाबा होणार आहे. त्यामुळे विराट 3 कसोटीतून माघार घेतली आहे. तसेच दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि इशांत शर्मा पहिल्या 2 कसोटींना मुकणार आहेत. यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया या महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडिलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडिलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

LPL 2020 | गुरुवारपासून रंगणार लंका प्रीमियर लीगचा थरार, टीम इंडियाचे ‘हे’ माजी खेळाडू गाजवणार मैदान

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडू मिळू शकते संधी

india vs australia 2020 ajinkya rahane is better than virat kohli as a test captain said ian chappell

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.