के एल राहुल, मुरली विजय विलन, भारताच्या पराभवाची 5 कारणं!

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पर्थ: पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 146 धावांनी धुव्वा उडवून, चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना, पाचव्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 140 धावातच आटोपला. भारताने आज 5 बाद 112 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. काल नाबाद असलेले हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी जास्तवेळ मैदानात तग धरला नाही. […]

के एल राहुल, मुरली विजय विलन, भारताच्या पराभवाची 5 कारणं!

पर्थ: पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 146 धावांनी धुव्वा उडवून, चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना, पाचव्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 140 धावातच आटोपला. भारताने आज 5 बाद 112 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. काल नाबाद असलेले हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी जास्तवेळ मैदानात तग धरला नाही. हनुमा विहारीने कालच्या धावात 4 धावांची घर घालून तो 28 धावांवर मागे परतला. तर काल 9 धावांवर नाबाद असलेल्या पंतने 30 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शेवटच्या 3 विकेट अवघ्या 2 धावा घेतल्या.

उमेश यादव 2, ईशांत शर्मा 0 आणि जसप्रीत बुमराह शून्यावर बाद झाला. तर मोहम्मद शमी शून्यावर नाबाद राहिला. रहाणे आणि ऋषभ पंत यांनी सर्वाधिक 30-30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी 3 तर हेजलवूड आणि कमिन्सने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावा केल्या. त्यानंतर भारताचा डाव 283 धावात आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला 43 धावांची आघाडी मिळाली. मग ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावात आटोपल्याने भारतासमोर एकूण 287 धावांचं लक्ष्य होतं. भारताला हे लक्ष्य गाठता आलं नाही, भारताचा दुसरा डाव 140 धावातच आटोपला.

भारताच्या पराभवाची पाच कारण

1) नाणेफेकीचा कौल

कोणत्याही सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असतो. पर्थसारख्या मैदानात तर तो अत्यावश्यक होता. पर्थची खेळपट्टी पाहता कोणताही संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला असता, तर त्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतंच.

2) सलामीवीरांची निराशाजनक कामगिरी

पर्थ कसोटीतही भारताच्या सलामीवीरांना अजिबात चांगली खेळी करता आली नाही. लोकेश राहुल आणि मुरली विजय हे दोघे यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहेत. या दोघांनी पहिल्या डावात 6 धावांची तर दुसऱ्या डावात 0 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात राहुलने 2 धावा केल्या होत्या, तर मुरली विजय शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात राहुल शून्यावर तर मुरली विजयला 20  धावा करता आल्या होत्या. त्याविरोधात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दोन्ही डावात उत्तम सलामी दिली.

3) भारताची ढेपाळलेली फलंदाजी

भारताच्या सलामीवीरांशिवाय अन्य फलंदाजांनाही मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या 51 धावा वगळता, अन्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. दुसऱ्या डावातही फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताला ऑस्ट्रेलियाचं आव्हान पेललं नाही.

4) ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात अपयश

या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली, तरी ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपासून रोखण्यात अपयश आलं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केल्याने त्यांना विजयापर्यंत पोहोचणं शक्य झालं असं म्हणावं लागेल.

5) फिरकीपटूची कमतरता

या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने चमकदार कामगिरी केली. लायनने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. तर भारत या कसोटीत पार्टटाईम फिरकीपटूसह मैदानात उतरला होता. त्यामुळे भारताला एका फिरकीपटूची कमतरता भासली असं म्हणावं लागेल.

 ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

बाद नसतानाही विराटला माघारी पाठवलं, पंचांवर चाहत्यांचा संताप  

AUSvsIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी 

विराट कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला 

अश्विन, रोहित शर्मा बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI