संजय मांजरेकरांकडे काही काम नाही, त्यांना मुंबईशिवाय काही दिसत नाही; के. श्रीकांत यांची टीका

भारतीय क्रिकेट संघातील दोन माजी सलामीवीर के. एल. राहुलच्या भारताच्या कसोटी संघातील निवडीवरुन आमनेसामने उभे आहेत.

संजय मांजरेकरांकडे काही काम नाही, त्यांना मुंबईशिवाय काही दिसत नाही; के. श्रीकांत यांची टीका
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 11:37 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दोन माजी सलामीवीर के. एल. राहुलच्या (KL Rahul) भारताच्या कसोटी संघातील निवडीवरुन आमनेसामने उभे आहेत. संजय मांजरेकांना (Sanjay Manjrekar ) वाटतं की, भारतीय कसोटी संघात के. एल. राहुलची निवड चुकीची आहे, तर के. श्रीकांत (K Srikanth) यांना मांजरेकरांचं म्हणणं पटलेलं नाही. तसेच श्रीकांत यांनी मांजरेकरांना सल्ला दिला आहे की, त्यांनी मुंबईशिवाय इतर गोष्टींचाही विचार करायला हवा. श्रीकांत त्यांच्या ‘चिकी चिका’ या युट्यूब चॅनेलवर बोलत होते. (India vs Australia : K Srikanth slams Sanjay Manjrekar over his reaction over KL Rahuls Selection in test team)

मांजरेकरांच्या म्हणण्यानुसार केवळ आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात के. एल. राहुल याची निवड योग्य नाही. राहुलने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. परंतु त्याची कसोटी संघातील निवड ही रणजी खेळणाऱ्या खेळाडूंचं मनोबल खच्चीकरण करणारी ठरेल.

श्रीकांत म्हणाले की, संजय मांजरेकरांना एकटं सोडा, त्यांच्याकडे कोणतीही नोकरी नाही. ते जे काही बोलतायत ते हास्यास्पद आहे आणि मी त्याच्याशी सहमत नाही. मांजरेकर के. एल. राहुलच्या कसोटी संघामधील निवडीबाबत सहमत नाहीत. परंतु राहुलने कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. मांजरेकरांनी केवळ वाद निर्माण करण्यासाठी प्रश्न उपस्थित करु नये. राहुल सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगलं खेळतोय. तुम्ही त्याचे रेकॉर्ड्स तपासा.

मांजरेकरांनी तपासले राहुलचे कसोटी रेकॉर्ड्स

मांजरेकरांनी ट्विटरवर राहुलचे कसोटी रेकॉर्ड्स मांडून श्रीकांत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मांजरेकांनी म्हटलं आहे की, मागील 12 कसोटी इंनिग्समध्ये राहुलने एकही अर्धशतक लगावलेलं नाही. जानेवारी 2018 पासून राहुल कसोटीत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. तेव्हापासून आतापर्यंत राहुलने 27 कसोटी सामन्यात केवळ 22.23 च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत.

श्रीकांत याबाबत म्हणाले की, राहुलने ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात एक शतक ठोकलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियात डेब्यू केला होता. तो जलदगती गोलंदाजांसमोर चांगलं खेळतो. मांजरेकराची एक समस्या आहे, ते केवळ मुंबईबद्दल विचार करतात, आम्ही मात्र तटस्थ आहोत. मांजरेकरांसाठी मुंबई, मुंबई आणि मुंबईच सर्वकाही आहे. ते मुंबईच्या बाहेर येऊन विचारच करत नाहीत.

संबंधित बातम्या

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

IPL 2020: सूर्यकुमारच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्रींचं ट्विट, संतप्त चाहत्यांचा शास्त्रींवर हल्लाबोल

(India vs Australia : K Srikanth slams Sanjay Manjrekar over his reaction over KL Rahuls Selection in test team)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.