India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज

रवीचंद्रन अश्विनने (ravichandran ashwin) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात सर्वाधिक 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज
रवीचंद्रन अश्विन
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 5:00 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड ( India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईत पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 578 धावांवर ऑलआऊट केलं. अश्विनने जेम्स अँडरसनला (James Anderson) बाद करताच इंग्लंडचा डाव आटोपला. अँडरसनला बाद करताच रवीचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. अश्विनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना 55.1 ओव्हरमध्ये 146 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. (india vs england 1st test 3rd day ravichandran ashwin become 3rd bowler who take 300 wickets in asia)

काय आहे विक्रम?

जेम्सला आऊट करताच अश्विन आशियात 300 विकेट घेणारा एकूण पाचवा तर तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. आशियामध्ये भारतीय गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा बहुमान टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावे आहे. कुंबळेने आशियात खेळलेल्या 82 कसोटींमध्ये 419 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 51 सामन्यात 300 विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त हरभजन सिंहनेही अशी कामगिरी केली आहे. हरभजनने 71 सामन्यांमध्ये आशियात 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

आशियात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथैय्या मुरलीथरनच्या नावे आहे. मुरलीने 97 सामन्यात 612 बळी घेतल्या आहेत. तसेच रंगना हेराथनेही आशियात 68 टेस्टमध्ये 354 विकेट्स घेतल्या आहेत.अशी कामगिरी करणारा तो तिसरा बोलर आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष

टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी पहिले 2 दिवस संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाला केवळ 8 विकेट्सच घेता आल्या. यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स घेत इंग्लंडला ऑलआऊट केलं. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने 218 धावांची द्विशतकी खेळी केली. तर डोमिनिक सिबले आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी 87 आणि 82 धावा केल्या. भारताकडून अश्विन आणि जसप्रीत बुमरारहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शाहबाज नदीम आणि इशांत शर्माने प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं.

टीम इंडियाचा पहिला डाव

टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात राहिली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल लवकर बाद झाले. रोहितने 6 धावा केल्या. तर शुबमनला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला या आकड्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. गिल 29 धावांवर बाद झाला.

यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनेही निराशा केली. विराट 11 तर रहाणे 1 धाव करुन बाद झाले. त्यामुळे भारताची 73 बाद 4 अशी स्थिती झाली. पण यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरला.

या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्याने ही टीम इंडियाला पाचवा धक्का बसला. पुजारा 73 धावांवर बाद झाला.

यानंतरही पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 90 धावांचा टप्पा ओलांडला शतकी खेळीच्या दिशेने तो आगेकूच करत होता. पण तो नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. पंत 91 धावांवर आऊट झाला. त्याने या खेळीत 9 फोर आणि 5 सिक्स खेचले. दरम्यान ताज्या माहितीनुसार वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन मैदानात खेळत आहेत.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test, 3rd Day Live | टीम इंडियाला सहावा धक्का, रिषभ पंत आऊट

(india vs england 1st test 3rd day ravichandran ashwin become 3rd bowler who take 300 wickets in asia)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.