India vs England 1st Test | रिषभ पंतसोबतच्या शतकी भागीदारामुळे चेतेश्वर पुजारा आनंदी, म्हणाला…..

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने (cheteshwar puajra and rishabh pant) पाचव्या विकेटसाठी 119 धावांची शतकी भागीदारी केली.

India vs England 1st Test | रिषभ पंतसोबतच्या शतकी भागीदारामुळे चेतेश्वर पुजारा आनंदी, म्हणाला.....
चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमध्ये पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिला सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. या दरम्यान पंत आणि पुजाराने वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली. या दोघांना शतक लगावण्याची संधी होती. पण दुर्देवाने ती संधी हुकली. पंतने 91 तर पुजाराने 73 धावांची खेळी केली. पंतसोबत बॅटिंग करताना मजा आली, असं टीम इंडियाचा तारणहार असलेला चेतेश्वर पुजारा म्हणाला. (india vs england 1st test day 3 cheteshwar puajra on rishabh pant)

पुजारा काय म्हणाला?

“पंतसोबत बॅटिंग करणं मी एन्जॉय करतो. तसेच मी बॅटिंग करतानाही त्याला काही टीप्स देत असतो.कोणता शॉट मारायचा आणि कोणता नाही, याबाबत मी त्याला सतत सांगत असतो”, असंही पुजाराने म्हटलं.

पंतने परिस्थितीनुसार फटकेबाजी करावी

“पंतचा हा नैसर्गिक खेळ आहे, म्हणून आम्ही त्याला जास्त थांबवू शकत नाही. तो जास्त बचावात्मक पद्धतीने खेळू शकत नाही. तो तसा खेळला तर आऊट होऊ शकतो. तो मनसोक्त पणे फटकेबाजी करत असतो. पण त्याने शॉर्ट सिलेक्शन करायला हवं. कोणता फटका मारायचा आणि कोणता नाही, हे पंतने समजून घ्यायला हवं. परिस्थितीनुसार मैदानात कसं खेळायचं हे ही त्याने जाणून घ्यायला हवं. यामध्ये संतुलन राखणं महत्वाचं आहे”, असं पुजारने नमूद केलं.

पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

टीम इंडियाचे सलामीवीर आणि मीडल ऑर्डरमधील मुख्य फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे भारताची 73 बाद 4 अशी स्थिती झाली. पण यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ

तिसर्‍या दिवशी भारताने 6 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया 321 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाकडून रिषभ पंतने 91 तर पुजाराने 73 धावांची खेळी केली. दरम्यान त्या आधी इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपला.

इंग्लंडच्या पहिल्या डावात 578 धावा

इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 578 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली. तर डोमिनिक सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज

India vs England 1st Test, Day 2 | बेन स्टोक्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, विक्रमाला गवसणी, ठरला तिसरा इंग्रज फलंदाज

(india vs england 1st test day 3 cheteshwar puajra on rishabh pant)

Published On - 10:39 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI